मराठी बातम्या  /  Religion  /  How To Take Blessings Of Ganpati Bappa On Sankashta Chaturthi

Sankashta Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीला श्रीगणेशाला अर्पण करा या गोष्टी

संकष्ट चतुर्थीला कोणत्या गोष्टी कराल
संकष्ट चतुर्थीला कोणत्या गोष्टी कराल (Freepik)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 07, 2023 01:53 PM IST

Most favorite Things Of Lord Ganesha : ‘प्रथम तुला वंदितो’ असं म्हणत कोणत्याही पूजेचा किंवा शुभ कार्याचा आरंभ आपण गणरायांच्या पूजेने करतो, इतका त्या गणपतीचा महिमा अगाध आहे.

बुद्धीच्या देवतेचं स्मरण करून त्यांना नमस्कार करण्याचा दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी. मे २०२३ मध्ये येणारी संकष्ट चतुर्थी ०८ मे रोजी येत आहे. 'प्रथम तुला वंदितो', असं म्हणत कोणत्याही पूजेचा किंवा शुभ कार्याचा आरंभ आपण गणरायांच्या पूजेने करतो, इतका त्या गणपतीचा महिमा अगाध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणरायांना काही गोष्टी अर्पण केल्यास गणराय तुमच्यावर खुश होतात आणि आशिर्वाद देतात, असं सांगण्यात आलं आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि संकष्ट चतुर्थीचे मुहूर्त कोणता आहे हेही आपण पाहाणार आहोत.

गणरायांना प्रिय गोष्टी कोणत्या?

गणपतीबाप्पाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट अर्पण करावी ती म्हणजे दुर्वा. श्रीगणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे २१ दुर्वांची एक माळ गणरायांना अर्पण करावी. याशिवाय गुळतुपाचा नैवेद्यही त्यांना प्रिय आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गणपतीबाप्पाला मोदक अर्पण करावे. मोदक हा गणरायांचा जीव की प्राण आहेत. गणरायांच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. ही पूजा चंद्रोदयानंतर केली जाते

संकष्ट चतुर्थी २०२३ ची तारीख कोणती?

वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी ०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होत आहे. ही चतुर्थी ०९ मे रोजी सायंकाळी ०४ वाजून ०८ मिनिटांनी संपेल. या दिवशी चंद्रोदयानंतर संध्याकाळी पूजा केली जाते, म्हणून या महिन्याचे संकष्ट चतुर्थी व्रत ०८ मे रोजी पाळले जाईल.

संकष्ट चतुर्थीची काय आहे पूजा पद्धत?

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणेशाची आराधना करून उपवासाचे व्रत करावं.

त्यानंतर संध्याकाळी पूजास्थान स्वच्छ करून पवित्र नदीतलं पाणी शिंपडावं.

गणपतीला वस्त्र परिधान करून मंदिरात दिवा लावा.

गणपतीच्या माथी टिळा लावून आपल्याही कपाळी टिळा लावावा. गणरायाला फुलं अर्पण करावी.

यानंतर गणपतीला २१ दुर्वांच्या जुड्या अप्रण कराव्या. दूर्वा हे गणपतीचं आवडतं खाद्य आहे. उकडीचे मोदक गणेशाला अर्पण करावेत.

पूजा संपल्यानंतर आरती करावी आणि पूजेत काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी.

संकष्ट चतुर्थीचे महत्व काय आहे?

सर्व देवता ज्या गणेशाची पूजा करतात त्याच गणरायाची पूजा घरोघरी मांडली जाते. संकष्ट चतुर्थीव्रत गणपतीसाठी किंवा श्रीगणेशाची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी केलं जातं. संकष्ट चतुर्थीला भक्तीभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक मनोकामना श्रीगणेश पूर्ण करतात, असे मानले जाते. याशिवाय श्रीगणेश त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात असंही मानलं जातं.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग