हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. शनिची चाल अत्यंत धीमी असते. मात्र हीच धीमी चाल भल्याभल्यांना रंक करते. त्यामुळेच शनि आणि त्याची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये आणि शनिदेवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत असतात. शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहावी असं वाटत असेल तर पुन्हा एकदा शनिदेवांना प्रसन्न करण्याची वेळ आली आहे. शनिची कृपा आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर शनिदेवांना लवकरच तुम्ही खूष करू शकाल. याचं कारण म्हणजे वैशाख महिन्याची अमावस्या. आता तुम्ही म्हणाल की, अमावस्या आणि शनिदेव यांचा काय संबंध?
आगामी वैशाख अमावस्या येत्या १९ मे २०२३ रोजी येत आहे. अशात याच अमावस्येच्या दिवशीच शनैश्चर जयंती साजरी केली जाणार आहे. शनैश्चर जयंती म्हणजे सूर्यदेव पुत्र शनिदेवांचा वाढदिवस. याला शनि जयंती असंही ओळखलं जातं.
असे मानले जाते की या दिवशी शुभ मुहूर्तावर शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. तर आज आम्ही तुम्हाला शनि जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सांगत आहोत.
शनि जयंतीची तारीख - १९ मे २०२३
वैशाख अमावस्या तिथीची सुरुवात - १८ मे रात्री ०९.४१ वाजता
वैशाख अमावस्या तिथीची समाप्ती - १९ मे रात्री ०९.२१ वाजता.
या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करून व्रत इत्यादी केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. या दिवशी पूजन केल्याने पूजा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व संकट आणि दुःख दूर होतात, तसेच शनिदेवांकडून सुख-समृद्धीचे आशीर्वादही प्राप्त होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)