Ganeshotsav 2023 Mumbai : यंदाच्या गणेशोत्सवाची मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० दिवसांच्या सणासाठी भाविकांनी बाजारात गर्दी करत विविध साहित्यांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु यंदाच्या गणेशोत्सवाला गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, विधी आणि धार्मिक उपवासाची धार्मिक पद्धत पार पाडावी लागणार आहे. उत्तरपूजा आणि षोडशोपचार पूजा गणेशोत्सवाच्या काळात पार पाडाव्या लागत असतात. त्यासाठी काय करायला हवं, जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी तुमचं घर, अंगण आणि संपूर्ण परिसराची चांगल्या पद्धतीनं स्वच्छता राखायला हवी. त्यानंतर पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, साहित्यांची खरेदी करून घरी आणावं. यामध्ये गणपतीची मूर्ती, फुलं, धूप, दिवे, फळं, मिठाई आणि पारंपरिक पूजा साहित्य यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, तिथं स्वच्छ कापड किंवा सजावटीचे व्यासपीठ तयार करायला हवं. त्यानंतर गणेशाची आरती करत असताना सोळा विधी, पुराणिक मंत्र, सोळा चरणांमध्ये उपासना करत भक्तिभावाने पूजा करायला हवी.
गणेश चतुर्थीचा उपवास करणार्यांनी सर्वात आधी अंघोळ करत स्वच्छ कपडे घालायला हवे. उपवास ठेवल्यानंतर व्यक्तीने सात्विक जेवण करण्यावर भर द्यायला हवा. जेवणात फळं, दूध, दूग्धजन्य पदार्थ, फळांचा रस, खीर आणि राजगिरा या पदार्थांचा समावेश करायला हवा. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंत्रांचं पठण करत धार्मिक विधी पार पाडावे लागत असतात. त्यासाठी १६ गुणांच्या षोडशोपचार पूजा करायला हवी. विधीमध्ये गणरायाला १६ प्रकारचे विविध नैवेद्य अर्पण करण्यात येत असतात.
गणेशोत्सवाची पूजा करत असताना आणि उपवास ठेवत असताना फुलं, फळं, मिठाई, धूप, दिवे आणि पाणी या पदार्थांचा पूजा आणि आहारात समावेश करायला हवा. त्यानंतर गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी उत्तरपूजा केली जाते. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मंत्रोच्चार करून हा विधी पार पाडला जात असतो. त्यानंतर १० व्या दिवशी गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जातं. गणेशमूर्तीचं तलाव, नदी किंवा समुद्रात विसर्जन करण्याची पद्धत अत्यंत योग्य, लाभदायक आणि धार्मिकदृष्या महत्त्वाची मानली जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)