Ganeshotsav Decoration 2023 : येत्या १९ सप्टेंबर पासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळं अनेकांनी सुट्टी टाकत कुटुंबियांसह गणेशोत्सवा साजरा करण्याची प्लॅनिंग आखली आहे. गणेश चतुर्थी पूर्वीच मंडप, डेकोरेशन, आरती व पूजेचं साहित्य, फुलं, नैवेद्य आणि अन्य साहित्यांची खरेदी करायला सुरुवात केली आहे. याशिवाय आवडती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी देखील अनेकांनी बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मार्केटमध्ये गणपती उत्सवाला लागणारे सर्व साहित्य मिळत असल्याने भाविक मोठ्या उत्साहात सजावटीच्या सामानांची खरेदी करत आहे. परंतु गणरायाला सजवण्यासाठी कोणत्या वस्तूंची खरेदी करायला हवी?, जाणून घेऊयात.
अनेकांना वेगवेगळ्या कलाकृती असलेली गणेशमूर्ती आवडत असते. परंतु गणेशमूर्ती कोणतीही खरेदी करा, परंतु ती पर्यावरण पूरक असायला हवी. त्यामुळं पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. तसेच विसर्जनानंतर गणेशमूर्ती सहजरित्या पाण्यात विरघळते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला बाजारात सहज मिळतील.
सर्वात आधी दरवाजाला सुंदर असं तोरण असायला हवं. गणेशमूर्तीसाठी मोत्यांचे हार किंवा कंठीची गरज असते. गणपतीची मूर्ती उठून दिसेल अशा मखराची निवड करायला हवी. त्यानंतर बाप्पांसाठी मोत्यांचे किंवा अन्य प्रकारच्या साहित्यांचे दागिने खरेदी करायला हवे. त्यानंतर मुकुटाची निवड करावी. मुकुटाच्या जागी तुम्ही फेट्याची देखील निवड करू शकता. कानातले, नाकातले आणि बांगड्यांची खरेदी करायला हवी. त्यामुळं तुमचा बाप्पा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसेल.
गणेशमूर्ती खरेदी केल्यानंतर सजावटीच्या सामानांची खरेदी करायला हवी. त्यामध्ये तांब्याचा कलश, उद्बत्ती, अगरबत्ती, फुलपात्र, तेलाचा दिवा किंवा समयी आणि आरतीसाठी घंट्याची खरेदी करायला हवी. याशिवाय पूजेसाठी तांदूळ, हळद, कुंकू, पाठ, दुर्वाच्या जोड्या, विड्यांची पानं, साखर, दही, दूध, तूप, मध, पंचामृत, २१ उकडीचे मोदक, नारळ, केळी आणि सुपारी या पदार्थांची खरेदी करायला हवी. गणरायाला बसण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे पाट किंवा चौरंग असायला हवेत. त्यामुळं पूजेच्या साहित्यांमध्ये या सर्व साहित्यांची खरेदी करायला हवी.
संबंधित बातम्या