
Vastu Tips For Dhan Labh : सध्याच्या काळात अनेक लोक संपत्ती वाढवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. त्यासाठी घरातील विविध गोष्टींची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्याचं पालन केलं तर व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक, बौद्धिक आणि आरोग्य शक्ती प्राप्त होत असते. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मक उर्जा संपवून सकारात्मक राहताना संपत्ती वाढवायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं?, चला तर जाणून घेऊयात.
दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातील देवांची पूजा करायला हवी. त्यामुळं तुमच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतील. तसेच सकारात्मक उर्जा निर्माण होऊन तुम्हाला संपत्ती वाढवण्यास आत्मविश्वास मिळेल. याशिवाय अंघोळ झाल्यानंतर घरात गंगाजल शिंपडायला हवं. त्यामुळं तुमच्या घरात येणारी संकटं टळतील. तसेच घरातील नकारात्मक भाव कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्लासभर पाण्यात हळदी मिक्स करून त्याला घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडायला हवं. त्यामुळं घरात नेहमीच सुख आणि शांती निर्माण होण्यास मदत होईल. याशिवाय अंघोळीच्या गरम पाण्यात नेहमीच थोडंसं मीठ टाकायला हवं, त्यामुळं तुम्हाला मनशांती मिळण्यास मदत होत असते.
कोणत्याही कुटुंबात जो प्रमुख व्यक्ती असतो, त्याने अन्य सदस्यांशी समोपचाराने आणि शांततेनं वागायला हवं. त्यामुळं घरात नेहमीच सर्वांमध्ये समन्वय राहण्यास मदत होते. घरातील मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांचा आदर केल्यास भविष्यात लहान मुलं थोरामोठ्यांचा आदर करायला शिकत असतात. त्यामुळं कुटुंबातील वरिष्ठ लोकांनी लहान मुलांना पैसे वाचवणं आणि पैशांची गुंतवणुक करण्याचे चांगले सल्ले द्यायला हवे. त्यामुळं मुलांना संपत्ती वाढवण्याची आणि गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागते. त्यामुळं तुम्हाला कमीत कमी दिवसात श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही या सवयींचं पालन करायला हवं.
संबंधित बातम्या
