Sankasta Chaturthi 2023 : कधी आहे संकष्ट चतुर्थी?, कशी करावी गणेशाची पूजा?
Importance Of Sankashti Chaturthi : श्रीगणेशाला बुद्धीची देवता म्हणून ओळखलं गेलं आहे. कोणत्याही पूजेच्या आधी श्रीगणेशाची पूजा करायची आणि मग पुढच्या पूजेला लागायचं असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे.
श्रीगणेशाला बुद्धीची देवता म्हणून ओळखलं गेलं आहे. कोणत्याही पूजेच्या आधी श्रीगणेशाची पूजा करायची आणि मग पुढच्या पूजेला लागायचं असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. पूर्वापार हीच पद्धत आपल्या सर्वांच्या घरी रूढ झालेली पाहायला मिळते. बुद्धीच्या याच देवतेची संकष्ट चतुर्थी ०८ मे २०२३ रोजी आपण साजरी करणार आहोत. संकष्टी चतुर्थीचे शुभ मुहूर्त कोणते आणि संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत काय हे आपण पाहाणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
संकष्टी चतुर्थी २०२३ ची तारीख कोणती
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी ०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होत आहे. ही चतुर्थी ०९ 9 मे रोजी सायंकाळी ०४ वाजून ०८ मिनिटांनी संपेल. या दिवशी चंद्रोदयानंतर संध्याकाळी पूजा केली जाते, म्हणून या महिन्याचे संकष्टी चतुर्थी व्रत ०८ मे रोजी पाळले जाईल.
संकष्टी चतुर्थीची काय आहे पूजा पद्धत
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणेशाची आराधना करून उपवासाचे व्रत करावं.
त्यानंतर संध्याकाळी पूजास्थान स्वच्छ करून पवित्र नदीतलं पाणी शिंपडावं.
गणपतीला वस्त्र परिधान करून मंदिरात दिवा लावा.
गणपतीच्या माथी टिळा लावून आपल्याही कपाळी टिळा लावावा. गणरायाला फुलं अर्पण करावी.
यानंतर गणपतीला २१ दुर्वांच्या जुड्या अप्रण कराव्या. दूर्वा हे गणपतीचं आवडतं खाद्य आहे. उकडीचे मोदक गणेशाला अर्पण करावेत.
पूजा संपल्यानंतर आरती करावी आणि पूजेत काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी.
संकष्ट चतुर्थीचे महत्व काय आहे
सर्व देवता ज्या गणेशाची पूजा करतात त्याच गणरायाची पूजा घरोघरी मांडली जाते. संकष्ट चतुर्थीव्रत गणपतीसाठी किंवा श्रीगणेशाची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी केलं जातं. संकष्ट चतुर्थीला भक्तीभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक मनोकामना श्रीगणेश पूर्ण करतात, असे मानले जाते. याशिवाय श्रीगणेश त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात असंही मानलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग