मराठी बातम्या  /  religion  /  Ramayana : मारूतीला 'बजरंगबली' या नावाने का ओळखतात? याचा नेमका अर्थ काय?
मारूतीचं नाव बजरंगबली कसं पडलं
मारूतीचं नाव बजरंगबली कसं पडलं (HT)

Ramayana : मारूतीला 'बजरंगबली' या नावाने का ओळखतात? याचा नेमका अर्थ काय?

23 May 2023, 15:55 ISTDilip Ramchandra Vaze

Ramayana Tales : रामायणाचा उल्लेख आपल्याला अनेक नात्यांची श्रेष्ठता दाखवतो. असंच एक अत्यंत सुदर नातं म्हणजे हनुमान आणि श्रीराम यांचं. हनुमानाला बजरंगबली हे नावही श्रीराम यांनी दिलं होतं.

रामायणाचा उल्लेख आपल्याला अनेक नात्यांची श्रेष्ठता दाखवतो. असंच एक अत्यंत सुदर नातं म्हणजे हनुमान आणि श्रीराम यांचं. हनुमानाला बजरंगबली हे नावही श्रीराम यांनी दिलं होतं. त्यामागची काय कहाणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

मारूतीचं नाव बजरंगबली कसं पडलं?

त्याचं झालं असं की, लंकेवरील विजयानंतर सीता आपल्या मांग किंवा भांग भरत होती. हनुमानाने त्यांना हे करताना पाहीलं आणि उत्सुकतेपोटी आपण असं का करत आहात असं विचारलं. त्यावर सीतेनेही आपल्या पतीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायू होण्यासाठी आपण असं करत असल्याचं हनुमानाला सांगितलं.

हनुमान रामभक्त होते आणि आपल्या धन्याच्या रक्षणासाठी त्यांची पत्नी एक चुटकी आपल्या भांगेत भरत आहे हे त्यांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी आपल्या सर्वांगाला शेंदूर फासलं आणि ते प्रभू श्रीराम यांच्यासमोर जाऊन उभे राहीले.

श्रीरामांना एव्हाना सीतेने झालेला सर्व प्रकार सांगितला होता. त्यामुळे हनुमानाचं ते सर्वांगाला शेंदूर फासलेलं रूप पाहून श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला लोकं तुला बजरंगबली या नावाने ओळखतील असा वर दिला.

बजरंग या नावाचा अर्थ भगवा असा होतो आणि बली म्हणजे शक्तीशाली. तेव्हापासून हनमानाला बजरंगबली या नावाने ओळखलं जातं.

मारूतीचं नाव हनुमान कसं पडलं?

एकदा बाल मारूतीला झोपेतून जाग आली. जाग आल्यावर सहाजिकच त्याला भूक लागली. आसपास काहीच नसल्यानं मारूती भूकेनं व्याकूळ झाला. त्याची नजर नुकत्याच उगवत असलेल्या सूर्यावर गेली. सूर्याचं ते लालकेशरी रुप पाहून मारूतीने ते सफरचंद असावं असं समजून सूर्याच्या दिशेने त्याला गिळंकृत करण्यासाठी झेप घेतली.

मारूतीला आपल्या जवळ येताना पाहून सूर्य घाबरला आणि त्याने मारूतीवर वज्रास्त्राचा आघात केला. वज्रास्त्राचा आघात पचवताना मारूतीच्या जबड्याला जखम झाली आणि तो पृथ्वीवर बेशुद्ध अवस्थेत पडला.

मारूतीला पवनपुत्र असंही म्हटलं जातं. सहाजिकच आपल्या मुलाची ही अवस्था वायुदेवांना पाहावली गेली नाही आणि त्यांनी आपण पृथ्वीवरून आपलं अस्तीत्व संपवत आहोत असं जाहीर केलं. घाबरलेल्या देवतांनी मग वायुदेवाची विनवणी केली. मग ब्रम्हाजींनी मारूतीला शुद्धीवर आणलं आणि यापुढे मारूतीवर शंकराच्या, कृष्णाच्या किंवा इतर कोणत्याही देवांच्या अस्त्राचा परिणाम होणार नाही असा वर दिला.

देवराज इंद्रानेही मग मारूतीला, ज्यानं वज्राचा भार आपल्या हनुवटीवर झेलला म्हणून मारूतीला हनु (जबडा) मान असं नाव दिलं. पुढे संपूर्ण सृष्टी मारूतीला हनुमान म्हणून ओळखेल असाही वर देवराज इंद्राने मारूतीला दिला आणि त्याचप्रमाणे मारूती हनुमान म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

 

विभाग