Home Temple: घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती ठेवाव्यात?, जाणून घ्या, काय आहे जाणकारांचे मत!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Home Temple: घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती ठेवाव्यात?, जाणून घ्या, काय आहे जाणकारांचे मत!

Home Temple: घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती ठेवाव्यात?, जाणून घ्या, काय आहे जाणकारांचे मत!

Nov 21, 2024 03:07 PM IST

Home Temple: अनेकांच्या घरात देव्हारे असतात. मात्र आपल्या घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती असाव्यात (Idols of Gods) हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त चित्र किंवा मूर्ती असल्यास त्यांची संख्या किती असावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती ठेवाव्यात?
घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती ठेवाव्यात?

Home Temple: अनेकांच्या घरात देव्हारे असतात. आपली ज्या देवावार श्रद्धा असते अशा देवांच्या मूर्ती आपल्या देव्हाऱ्याच विराजमान झालेल्या असतात. मात्र आपल्या घरातील देव्हाऱ्यात किती मूर्ती असाव्यात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती असल्यास त्यांची संख्या किती असावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

बहुतेक हिंदू घरांमध्ये पूजेसाठी लहान आकाराचे मंदिर असते. त्यास देव्हारे असे म्हणतात. हे देव्हारे संगमरवरी दगडापासून ते लाकडापर्यंत बनवलेली असतात. लोक त्यांच्या श्रद्धेनुसार आणि भक्तीनुसार त्याची स्वच्छता आणि सजावटीची पूर्ण काळजी घेतात. लोक दररोज पहाटे आणि सायंकाळी देव्हाऱ्यात ठेवलेल्या देवतांची पूजा करतात. घरातील देव्हाऱ्यांमध्ये गणपती, भगवान शिव, श्रीकृष्ण, हनुमान, माता दुर्गा, सरस्वती, राम-जानकी, साईबाबा यांची पूर्ण श्रद्धेने देव्हाऱ्यात स्थापना केली जाते.

या सर्व देवी-देवतांची रोज नित्य पूजा केली जाते. विशेष प्रसंगी देव किंवा देवीची विशेष पूजा देखील केली जाते. साधारणपणे प्रत्येक देवतेची एकच मूर्ती किंवा फोटो घराच्या मंदिरात ठेवावे आणि जास्त चित्रे ठेवणे टाळावे. एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती असल्यास गृहमंदिरातील मूर्तींची संख्या किती असावी आणि या संदर्भात धार्मिक तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊया….

गणपतीची मूर्ती

घरामध्ये गणपतीची मूर्ती आणि फोटो ठेवणे खूप शुभ मानले जाते. विविध आकाराच्या गणेशमूर्ती भक्तांच्या घराघरात पाहायला मिळतात. धार्मिक तज्ज्ञांच्या मते, घरामध्ये गणपतीची मूर्ती विषम संख्येत असावी.  म्हणजेच घरात गणेशाच्या मूर्ती  ३, ५, ७ किंवा ९ असाव्यात. अशा संख्येत मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

शिवलिंग

घरच्या मंदिरात शिवलिंग स्थापित केले असेल तर त्याच्या आकाराची आणि संख्या किती असावी हे फार महत्त्वाचे आहे. गृह मंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगाचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग अत्यंत सतर्क आणि संवेदनशील मानले जाते, त्यामुळे मोठ्या आकाराचे शिवलिंग घराच्या मंदिरात ठेवू नये. यासोबतच गृह मंदिरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत. शिवलिंग नेहमी पाण्याने भरलेल्या पात्रात स्थापित करावे.

माता दुर्गा

प्रत्येक घराच्या मंदिरात आदिशक्ती दुर्गामातेची  मूर्ती किंवा फोटो नक्कीच असते. माता काली आणि माता दुर्गा या मातेच्या विविध रूपांचे फोटो कधीही तीन संख्येत नसावीत. त्यांची चित्रे तीन पेक्षा कमी किंवा त्याहून अधिक संख्येत ठेवता येतात.

हनुमान

प्रत्येक घरात उपस्थित असलेल्या हनुमानाच्या भक्तांनी हनुमानाची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवावी. या आसनातील हनुमानाचे चित्र आणि मूर्ती घरात ठेवणे उत्तम मानले जाते.

राम, सीता आणि शिव परिवार

गृह मंदिरात राम जानकी आणि भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो लावावीत. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि कौटुंबिक मूल्यांना चालना मिळते.

मंदिराची दिशा

घरातील मंदिर नेहमी उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. वास्तूनुसार हे ठिकाण मंदिरासाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. यासोबतच मंदिराचे तोंड पूर्वेकडे असावे. असे मानले जाते की योग्य ठिकाणी मंदिराची स्थापना केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती वाढते. याशिवाय मंदिर कधीही बेडरूम किंवा बाथरूमजवळ नसावे. यामुळे घरात नकारात्मक परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन घरच्या मंदिरात देवी-देवतांची प्रतिष्ठापना करून त्यांची नित्य पूजा केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner