मराठी बातम्या  /  धर्म  /  Dussehra 2022 : भारतातल्या वेगवेगळ्या भागात कसा साजरा केला जातो दसरा, वाचा सविस्तर

Dussehra 2022 : भारतातल्या वेगवेगळ्या भागात कसा साजरा केला जातो दसरा, वाचा सविस्तर

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Oct 04, 2022 11:21 AM IST

How Dussehra Will Celebrate In India : विजया दशमी हा असत्यावर सत्याचा विजय म्हणून देशभर साजरा केला जातो. रामाचा रावणावर विजय किंवा दुर्गेचा महिषासूरावर विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मात्र देशाच्या वेगवेगळ्या भागात हा उत्सव कसा साजरा होतो, याची माहिती घेऊया.

देशात कसा साजरा केला जातो दसरा
देशात कसा साजरा केला जातो दसरा (हिंदुस्तान टाइम्स)

विजया दशमी हा असत्यावर सत्याचा विजय म्हणून देशभर साजरा केला जातो. रामाचा रावणावर विजय किंवा दुर्गेचा महिषासूरावर विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या दिवशी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात केली जाते. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची, सोन्याची खरेदी केली जाते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वतीचं पूजन दसऱ्याच्या दिवशी केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्यामागेही एक प्रथा आहे. तसेच, घरोघरी सोनं म्हणून आपट्याची पानं देण्याची प्रथा आहे एक नजर टाकूया देशातल्या विविध भागात दसरा कसा साजरा होतो यावर.

भारतातील विविध प्रांतात कसा साजरा केला जातो दसरा

उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रमुख्याने पाहायला मिळतं. नऊ दिवस सुरू असलेल्या रामलीलेच्या नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा अत्यंत वेगळा असा असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

गुजरात

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा सण आनंदात साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगड

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी तब्बल अडीच महिने दसरा साजरा केला जातो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव म्हणून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय यालाही यावेळेस महत्त्व दिले जाते.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

विजयादशमी सरस्वतीपूजन

पंजाब

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.

दक्षिण भारत

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

आंध्रप्रदेश

आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग