मराठी बातम्या  /  धर्म  /  Mangalwar Upay : नशीब साथ देत नाहीये?, मग मंगळवारी अवश्य करा 'हे' उपाय

Mangalwar Upay : नशीब साथ देत नाहीये?, मग मंगळवारी अवश्य करा 'हे' उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 14, 2023 07:22 AM IST

Things To Do On Mangalwar : काम अडलं की मग ते पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. मात्र काहीही केलं तरी ते काम पूर्णत्वास जात नाही अशावेळेस होणारी चिडचिड टाळण्यासाठी काही खास उपाय आहेत जे केले पाहिजेत.

मंगळवारी कोणते उपाय करावेत
मंगळवारी कोणते उपाय करावेत (हिंदुस्तान टाइम्स)

आज मंगळवार १४ मार्च २०२३. आजच्या दिवशी मारुतीरायाला नमस्कार करण्याचा दिवस आहे. आज कोणतंही काम अडलं असेल तर अतिशय सोपे उपाय आहेत, जे केल्याने आपण मारुतीचा कृपाशिर्वाद मिळवू शकतो. आज आपण पाहाणार आहोत असे उपाय जे केल्याने तुमचं नशीब उजळून निघू शकतं. कोणते आहेत ते उपाय चला पाहूया.

ट्रेंडिंग न्यूज

मंगळवारी कोणते उपाय करावेत 

मारुतीला दिवा दाखवावा

मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमानाला दिवा दाखवावा. दिव्याची वात बनवताना त्यात थोडासा शेंदूर लावावा जेणेकरुन त्या वातीचा रंग लालसर होईल. दिवा कायम तुपाचा असावा.

मारुती स्तोत्राचा जप करावा

दर मंगळवारी मारुती स्तोत्र म्हणावे. दर मंगळवारी सकाळ संध्याकाळी मारुती स्तोत्राचं पठण करावं. असं केल्याने तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होईल. जर काही कारणास्तव सकाळ संध्याकाळी स्तोत्र म्हणणं शक्य होत नसेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मारुतीरायाचं स्मरण करावं.  

मारुतीला तुळस अर्पण करावी

हनुमानजींना तुळस अत्यंत प्रिय आहे. हनुमानजींच्या चरणी तुळशीच्या पानावर श्री राम लिहून मंगळवारी त्यांना अर्पण करा. या उपायाने बजरंगबली प्रसन्न होऊन भक्तांचे सर्व संकट दूर करतात. या दिवशी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

प्राण्यांना गूळ आणि हरभरा खायला द्या

गूळ आणि भाजलेले हरभरे मंगळवारी माकडांना किंवा गायीला खाऊ घालू शकता. मंगळावर उपाय म्हणूनही हे खूप प्रभावी मानले जाते. गाईला गूळ खाऊ घातल्याने सूर्याचाही तुमच्यावर अनुकूल प्रभाव पडतो.

मंगळवारी म्हणा हा श्लोक 

ॐ हं हनुमते नम:.'

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्।

सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥

ॐ अंजनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात्।

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग