मराठी बातम्या  /  धर्म  /  Holi wishes : होळी रे होळी पुरणाची पोळी...अशा द्या होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा

Holi wishes : होळी रे होळी पुरणाची पोळी...अशा द्या होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 26, 2024 09:46 AM IST

Holi 2024 Wishes messages : रविवार २४ मार्च रविवार रोजी, फाल्गुण पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा हा होळीचा सण साजरा केला जाईत तर २५ मार्च रोजी धूलीवंदनाचा सण साजरा होत आहे. अशा द्या होळीच्या सर्वांना खास अतरंगी शुभेच्छा.

होळी २०२४ शुभेच्छा
होळी २०२४ शुभेच्छा

रविवार २४ मार्चला होलिका दहन तर सोमवार २५ मार्चला धूलिवंदन साजरा केला जात आहे. मराठी कालनिर्णयातील शेवटचा फाल्गुन महिन्यात होळी हा सण साजरा केला जातो. ऋतू बदलानिमीत्त हा एक उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी वर्गणी गोळा करून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस यांची होळी उभारली जाते. या होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. नारळ फोडला जातो आणि नंतर तिचं दहन केलं जातं. हे पण राक्षसी होलिकेचंच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात.

होळीच्या शुभेच्छा देत उद्या होलिका दहन साजरा करूया त्यासाठी खास शुभेच्छा संदेश...

होळीच्या शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,

‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,

‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,

‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,

‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,

‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,

होळीच्या या सात रंगांसोबत,

तुमचे जीवन रंगून जावो…

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आली रे आली, होळी आली

चला, आज पेटवूया होळी

नैराश्याची बांधून मोळी

दाखवून नैवद्य पुरणपोळीचा

मारूया हाळी...

होळी रे होळी, पुरणाची पोळी

करू आनंदाने साजरी होळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा

रंग नात्यांचा, रंग बंधाचा

रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्सावाचा साजरा

करू होळी संगे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला आला रंगोत्सव हा आला …

तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,

प्रेम भाव निर्माण करू,

मिटवूया एकमेकातला वाद

खेळूया रंग उधळूया रंग,

तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा

होळीत पेटवू मनातला राग, द्वेश, मत्सर

रंगानी करू सर्वांना आपलंस

मिळून सर्व घेऊ धुलीवंदनाचा आनंद

चला साजरी करू फाल्गुन पौर्णिमा मस्त

होळीच्या हार्दीक शुभेच्छा

धुलीवंदनाच्या हार्दीक शुभेच्छा

WhatsApp channel

विभाग