मराठी बातम्या  /  धर्म  /  Holi 2024 : होळीच्या दिवशी करा शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी

Holi 2024 : होळीच्या दिवशी करा शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 13, 2024 03:58 PM IST

Holi 2024 : होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणांपैकी एक आहे. होळी भगवान विष्णूचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. याशिवाय हा दिवस राधा-कृष्णाशीही जोडला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की होळीचा संबंध भगवान महादेव आणि माता पार्वतींशी देखील आहे.

Holi 2024 : होळीच्या दिवशी करा शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी
Holi 2024 : होळीच्या दिवशी करा शिव शंकराचे 'हे' अचूक उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी (AFP)

हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्व आहे. अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते.

अशा स्थितीत यंदा होळीचा सण २५ मार्च रोजी साजरा होणार आहे. दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला सर्वांना माहित असेलच, परंतु तुम्हाला माहित आहे का की भगवान शिवाशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे. येथे आपण भगवान शंकराशी संबंधित होळीची पौराणिक कथा जाणून घेणार आोहोत.

भगवान शंकराशी संबंधित होळीची पौराणिक कथा  

पौराणिक दृष्टीकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकराशीही जोडला गेला आहे. शिवरात्रीच्या ठीक १५ दिवसांनी होळी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते, परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे. अशा स्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले. तेथे त्यांनी भगवान शंकराच्या उपासनेत व्यत्यय आणला.

भगवान शंकर क्रोधित झाले

यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले. पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेावाची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली. यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले. याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्तावदेखील स्वीकारला. याच्या आनंदात सर्व देवी-देवतांनी रंगोत्सव साजरा केला. हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता, अशी मान्यता आहे.

होळीच्या दिवशी हे उपाय करा

धार्मिक मान्यतांनुसार होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते. या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग