Hartalika Wishes : सण सौभाग्याचा… हे खास संदेश प्रियजनांना पाठवा आणि द्या हरतालिकेच्या शुभेच्छा-hartalika wishes in marathi post captions quotes status heart touching messages shubhechha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Hartalika Wishes : सण सौभाग्याचा… हे खास संदेश प्रियजनांना पाठवा आणि द्या हरतालिकेच्या शुभेच्छा

Hartalika Wishes : सण सौभाग्याचा… हे खास संदेश प्रियजनांना पाठवा आणि द्या हरतालिकेच्या शुभेच्छा

Sep 03, 2024 10:55 PM IST

Hartalika Wishes 2024 : भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी हरतालिकेचे व्रत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास आणि पूजेसोबत, लोक आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देखील देतात. या खास संदेशांसह तुम्ही तुमच्या प्रियजनांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा पाठवू शकतात-

हरतालिकेच्या शुभेच्छा
हरतालिकेच्या शुभेच्छा

Hartalika 2024 Wishes and Messages : हरतालिका व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल राहून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी हे व्रत ठेवले होते. त्यानंतर भगवान शिव पार्वतीला पती म्हणून प्राप्त झाले होते. शास्त्रानुसार, अविवाहित मुलींनीदेखील हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांना इच्छित वर मिळतो अशी मान्यता आहे.

या वर्षी शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी शुभ योग-संयोगात हरतालिका हे व्रत केले जाईल. या दिवशी उपवास आणि पूजेसोबत, लोक आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देखील देतात. या खास संदेशांसह तुम्ही तुमच्या प्रियजनांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा पाठवू शकतात-

हरतालिकेच्या शुभेच्छा

माता उमाला मिळाला जसा शिव वर

तुम्हालाही मिळो मनाजोगता वर

करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर

अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो,

हिच इश्वरचरणी प्रार्थना, हरितालिकेच्या शुभेच्छा

सण हा हर्षाचा, आनंदाचा,

हरतालिका पूजन करण्याचा

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा

माता पार्वतीने केले हरतालिका व्रत

म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,

हरतालिकेच्या शुभेच्छा!

वातावरणात गारवा आहे,

आनंदी आनंद झाला आहे,

हरतालिकेच्या या दिवशी,

प्रेमाचा दिवस आला आहे,

हरतालिकेच्या शुभेच्छा!

सौभाग्याचे देणं आहे हरतालिका,

मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,

हीच शंकरा चरणी इच्छा

हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा!

सण सौभाग्याचा,

पतीवरील प्रेमाचा,

हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!

हरतालिका तृतीया निमित्त,

सर्व माता भगिनी आणि

कुमारिकांना मंगलमय शुभेच्छा

माता उमाच्या थाळी

जसा शिवाचा पिंजर

उपवर कन्येची प्रार्थना

मिळो मनाजोगता वर,

हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

य देवी हरतालिके|सखी पार्वती अंबिके

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

देवि- देवि उमे गौरि त्राहि मां करूणानिधे ।

ममापराधः क्षन्तव्या भुक्ति- मुक्ति प्रदा भव ।।

हरतालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

शिव व्हावे प्रसन्न, 

पार्वतीने द्यावे सौभाग्यदान

हरतालिका तृतीयेच्या 

मन:पूर्वक शुभेच्छा