Happy Ganesh chaturthi : बड्डे आहे बाप्पाचा… प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Happy Ganesh chaturthi : बड्डे आहे बाप्पाचा… प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा

Happy Ganesh chaturthi : बड्डे आहे बाप्पाचा… प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा

Sep 19, 2023 09:33 AM IST

Ganesh Chaturthi 2023 Wishes : उद्या, १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. या उत्सवाची सुरुवात उत्तमोत्तम शुभेच्छा संदेशांनी करा. हे शुभेच्छा संदेश वाचा!

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023

Ganesh Chaturthi Wishes 2023 : अधिक मास आल्यामुळं यंदाचा गणेशोत्सव काहीसा उशिरानं साजरा होत आहे. उद्या, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. पाच दिवसांचा गणेशोत्सव २३ सप्टेंबरपर्यंत तर, १० दिवसांचा गणेशोत्सव २८ सप्टेंबरपर्यंत साजरा होणार आहे. बाप्पाच्या आगमानची जय्यत तयारी झाली आहे. घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळं लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.

गणेशोत्सवाची तयारी झाल्यानंतर आता एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर गर्दी होईल. उत्तमोत्तम संदेश देण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरचा आधार घेतला जाईल. कोणी स्वत: चारोळ्या तयार करेल. कोणी गीतांचा आधार घेईल तर कुणी गणेशाचं गुणवर्णन करतील. हे लक्षात घेऊन आम्ही इथं काही शुभेच्छा संदेश देत आहोत. हे संदेश तुम्ही मित्र मंडळींना, नातलगांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता…


अशा प्रकारे देता येतील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023

 

बुद्धिदाता, सुखकर्ता, दु:खहर्ता श्रीगणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्नांचं हरण करो... गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

गणनायक गजानन तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया,

संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया...

हॅप्पी गणेश चतुर्थी.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, 

निर्विघ्नं कुरुमें देव, सर्वकार्येषु सर्वदा. 

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Ganesh chaturthi 2023
Ganesh chaturthi 2023

नव्या कामाची सुरुवात चांगली होवो, प्रत्येक इच्छा पूर्ण होवो…

तुमच्या हृदयात सदैव गणेशाचा वास असो,

गणेश चतुर्थी प्रियजनांसोबत आनंदात जावो!

गणेश चतुर्थी २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा!

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला…

मखर नटून तयार झाले, वाजतगाजत बाप्पा आले…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला आनंद गणरायाच्या कानाइतका विशाल असावा,

अडचणी उंदीरमामाइतक्या पिटुकल्या असाव्यात,

आयुष्य सोंडेइतके लांब असावे, मन पोटासारखे व्यापक असावे आणि आयुष्यातील क्षण बाप्पाच्या हातातील मोदकासारखे गोड असावेत…

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganpati Bappa morya
Ganpati Bappa morya

भक्ती गणपती, शक्ती गणपती,

सिद्धी गणपती, बुद्धी गणपती,

लक्ष्मी गणपती, महागणपती

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास, घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास, अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

सरला श्रावण, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली...

सज्ज व्हा उधळायला फुले, गणरायाची स्वारी आली

सर्वांच्या तोंडी चिंघम, बाप्पाच्या रूपानं आलाय आमचा सिंघम…

गणपती बाप्पा मोरया!

Whats_app_banner