मराठी बातम्या  /  धर्म  /  Diwali Padwa Wishes: दिवाळी पाडव्याच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' मराठमोळ्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes: दिवाळी पाडव्याच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' मराठमोळ्या शुभेच्छा!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 14, 2023 01:37 PM IST

Diwali Padwa Wishes In Marathi: यावर्षी दिवाळी पाडवा येत्या मंगळवारी म्हणजेच १४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

Diwali Padwa 2023
Diwali Padwa 2023

Diwali Padwa 2023: अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यावर्षी दिवाळी पाडवा येत्या मंगळवारी म्हणजेच १४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा अतिशय शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजननंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते. त्यासोबतच, नवीन घर, वाहन यांसारख्या अनेक गोष्टींची खरेदी केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

पौराणिक कथेनुसार, राक्षस कुळात जन्मलेल्या बळीराजाने देवांचा पराभव केला. मात्र, तो दानशूर होता. कोणत्याही गोष्टीचे दान करताना तो मागे पुढे पाहत नसे. एकदा त्याने यज्ञ केले. त्यावेळी भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागायला गेले. तेव्हा बळी राजाने त्याला काय हवे आहे असे विचारले, यावर बटू वामनाने त्याच्याकडे तीन पाऊल जमीन मागितली. बळीराजाने विचार न करता दान दिले. दान मिळताच वामनाने विराट रूप धारण केले आणि पहिल्या पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतराळ व्यापून घेतले.

त्यानंतर बटू वामनाने त्याला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले. यावर बळीराजा म्हणाला की तो माझ्या डोक्यावर ठेवा. वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळलोकी पाठवले. पाताळात बळीराजाचे राज्य स्थापन झाले. पाताळात जाण्याआधी बळीराजाने पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा एक वर मागितला. वामनाने हा वर दिला. वामनाने दिलेल्या वरामुळेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नागरिक बळीराजाच्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा करतात.

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,

उत्तम दिनाचे महात्म्य आहे,

सुखद ठरो हा छान पाडवा,

त्यात असूदे अवीट गोडवा...

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

 

जुना कालचा काळोख,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास...

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,

दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

पण तुझी साथ कधी न सुटती,

हीच इच्छा कायमस्वरूपी मनी

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,

पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,

उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,

हीच देवा चरणी प्रार्थना,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दिवाळीला पाडवा म्हणजेच अर्धा मुहूर्त असतो. अर्थशास्त्रदृष्टीने व्यापारी लोक या दिवशी नव्या वर्षाची सुरुवात करतात. लक्ष्मीपूजन करून ते व्यापाराचा आरंभ करतात.

WhatsApp channel

विभाग