मराठी बातम्या  /  religion  /  Hanuman Jayanti 2023 : कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी म्हणा हनुमान चालिसाच्या या चौपाई
हनुमान
हनुमान (हिंदुस्तान टाइम्स)

Hanuman Jayanti 2023 : कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी म्हणा हनुमान चालिसाच्या या चौपाई

01 April 2023, 10:00 ISTDilip Ramchandra Vaze

Importance Of Hanuman Chalisa : आजचा दिवस मारुतीरायाला समर्पित आहे. याशिवाय येत्या ६ एप्रिल रोजी आपण हनुमान जयंतीही साजरी करणार आहोत. अशात हनमान चालिसाचा जाप रोज करणं अत्यंत फलदायी मानलं जातं.

मध्यंतरीच्या काळात राजकीय पटलावर हनुमान चालिसाने जे रामायण झालं त्यावर वेगळ्याने काही बोलायची गरज नाही. एक मात्र नक्की की, हनुमान चालिसाचा जाप केल्यावर अनेक संकटं दूर होतात. आज शनिवार ०१ एप्रिल २०२३. आजचा दिवस मारुतीरायाला समर्पित आहे. याशिवाय येत्या ६ एप्रिल रोजी आपण हनुमान जयंतीही साजरी करणार आहोत. अशात हनमान चालिसाचा जाप रोज करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. तुम्हाला काही असाध्य रोग असतील तर त्यासाठीही किंवा धनविद्या प्राप्तीसाठीही हनुमान चालिसा अत्यंत महत्वाची मानली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

संकटांचा नाश व्हावा यासाठी हनुमान चालिसाची ही चौपाई म्हणावी

चौपाई- संकट तें हनुमान छुड़ावै। मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

शारिरीक व्याधींपासून मुक्त होण्यासाठी ही चौपाई रोज म्हणावी

नासै रोग हरे सब पीरा। जपत निरंतर हनुमत बलबीरा।।

हनुमान चालिसाच्या या चौपाईचा किमान १०८ वेळा जप केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व शारीरिक वेदना दूर होतात. त्याचबरोबर व्यक्तीमध्ये रोग आणि दोषांची भीती कमी होते.

पैसा आणि ज्ञानासाठी ही चौपाई म्हणावी

 विद्यावान गुणी अतिशय हुशार. रामकाज करिबे आतुर ।

हनुमान जयंतीच्या दिवशी या चौपईचे पठण केल्याने शिक्षण आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि श्री राम नामाचे स्मरण केल्याने मनुष्य जीवनात आपले ध्येय साध्य करतो.

समस्यांपासून मुक्तीसाठी ही चौपाई म्हणावी

कट तें हनुमान छुड़ावै। मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

हनुमान चालिसाच्या या चौपाईचा किमान १०८ वेळा जप केल्याने साधकाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि भविष्यातील समस्यांशी लढण्याची शक्ती प्राप्त होते.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही चौपाई म्हणावी

और मनोरथ जो कोई लावै। सोइ अमित जीवन फल पावै।।

आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाच्या या चौपाईचा अखंड पठण केल्याने बजरंगबली आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांना जीवनात सुखद परिणाम प्राप्त होतात.

विभाग