मराठी बातम्या  /  धर्म  /  Hajj Yatra 2024 : हज यात्रेसाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Hajj Yatra 2024 : हज यात्रेसाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Jun 07, 2024 08:28 PM IST

How To Apply Hajj Yatra 2024 : तुम्ही हज यात्रेला जात असाल, तर नोंदणी कशी करायची आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Hajj Yatra 2024 : हज यात्रेसाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Hajj Yatra 2024 : हज यात्रेसाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या (AFP)

इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी हज यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यात धु अल-हिज्जामध्ये ही तीर्थयात्रा केली जाते. यंदा म्हणजेच २०२४ मध्ये, १४ जूनच्या संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर हज यात्रेला सुरुवात होईल.

ट्रेंडिंग न्यूज

जर तुम्हीही हज यात्रेला जाणार असाल तर आज आम्ही तुम्हाला या लेखात त्याची संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणार आहोत.

साधारणपणे, कोणत्याही परदेशी हज यात्रेकरूकडे वैध पासपोर्ट आणि आरोग्य प्रमाणपत्र (हेल्थ सर्टिफिकेट) असणे आवश्यक आहे. तसेच, हज यात्रेला जाण्यासाठी प्रवाशाचे वय १२ वर्षांपेक्षा जास्त असावे. याशिवाय हज यात्रेकरूंनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल आता जाणून घेऊया.

यंदा म्हणजेच २०१४ मध्ये हज यात्रा १४ जूनपासून सुरू होणार असून ती १९ जूनपर्यंत चालणार आहे. हज आणि उमराह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हज यात्रेला जाणाऱ्या व्यक्तीकडे नुसुक (Nusuk) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हज परमिट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय हज यात्रेला जाणे बेकायदेशीर ठरेल.

तुमची नोंदणी देखील Sehhaty ॲपवर असावी. याद्वारे तुम्हाला सर्व प्रकारचे लसीकरण मिळाले आहे की नाही हे कळू शकेल. या ॲपवर तुमची नोंदणी नसल्यास तुम्हाला हज यात्रा करण्यापासून रोखले जावू शकते. पोलिओ लसीकरणाशिवाय हज यात्रेकरूंना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

हज यात्रेसाठी अर्ज कसा करायचा?

हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्यांना प्रथम hajcommittee.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

यानंतर नवीन युजरला नाव आणि पासवर्डसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल ज्याद्वारे तुमची पडताळणी केली जाईल आणि खाते सक्रिय केले जाईल.

यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रांसह हज अर्ज भरावा लागेल. लक्षात ठेवा की सर्व कागदपत्रे खरी असावीत. तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रेही वेबसाइटवर अपलोड करावी लागतील.

शेवटी फीची प्रक्रिया केली जाईल. तुम्ही क्रेडिट-डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे फी भरू शकता.

अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल

हज यात्रेसाठी ३ ते ४ लाख रुपये खर्च येतो. हज यात्रेकरूंशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट म्हणजे सर्व यात्रेकरू त्यांचे कफन देखील सोबत घेतात. प्रवासादरम्यान काही अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास मृतदेह झाकण्यासाठी या कफनाचा वापर केला जातो. सुखरूप घरी आल्यास हे कफन मृत्यूच्या वेळी वापरले जाते.

WhatsApp channel
विभाग