ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी गुरु पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे. जुलैमध्ये सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो. यामध्येही गुरु पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, या नक्षत्रात केलेले काम खूप शुभ फळ देते, त्यामुळे या योगात खरेदी करावी. याच दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृतसिद्धी योगही निर्माण होत आहे. या दिवशी सर्वात मोठा शुभ मुहूर्त म्हणजेच गुरु पुष्य योग तयार होत आहे. गुरु पुष्य नक्षत्र कधी आहे? त्याचे महत्व काय आहे? खरेदीसाठी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी इतके खास आणि महत्वाचे का आहे ते जाणून घ्या.
यावेळी हे नक्षत्र दिवाळीपूर्वी २४ ऑक्टोबरला आहे.
पुष्य नक्षत्र प्रारंभ : २४ ऑक्टोबर २०२४, गुरुवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटापासून ते
पुष्य नक्षत्र समाप्ती : २५ ऑक्टोबर २०२४, शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटापर्यंत.
दिवाळीपूर्वीचे गुरु पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे या नक्षत्रात तुम्ही खरेदी करू शकतात.
जर पुष्य नक्षत्र रविवारी आले तर त्याला रवि पुष्य नक्षत्र म्हणतात आणि जर ते गुरुवारी आले तर त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. साधारणत: गुरुवार किंवा रविवारी येणारे पुष्य नक्षत्र उत्तम मानले जाते. याला पुष्य नक्षत्रांचा राजा म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे, त्यामुळे लक्ष्मी-नारायणाची पूजा विशेष आहे असे सांगितले जाते. गुरु पुष्य नक्षत्राच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून केळीच्या झाडाच्या मुळास पाणी आणि हरभरा डाळ अर्पण करावी, असे सांगितले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पंचामृताने स्नान करावे आणि तुळशीने पंचमेव अर्पण करावे. असे केल्याने लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने संपत्ती वाढते. जेव्हा तुम्ही या नक्षत्रात कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा ती तुमच्यासाठी शुभ असते आणि वृद्धीदायक ठरते, आशीर्वाद देते. तसेच तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते.
घर, प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याव्यतिरिक्त दिवाळीपूर्वी सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागिने खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही दुचाकी-चारचाकी आणि टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या