Guru Purnima Wishes : आज गुरुपौर्णिमा… गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करा, हे खास संदेश पाठवा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Guru Purnima Wishes : आज गुरुपौर्णिमा… गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करा, हे खास संदेश पाठवा!

Guru Purnima Wishes : आज गुरुपौर्णिमा… गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करा, हे खास संदेश पाठवा!

Updated Jul 21, 2024 01:18 PM IST

Guru Purnima 2024 Wishes In Marathi : गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून, आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे शुभेच्छा संदेश ठरतील खास.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. आषाढ महिन्याची पौर्णिमा २० जुलै रोजी संध्याकाळी ५:५९ पासून सुरू होईल, तर २१ जुलै रोजी दुपारी ३:४६ वाजता समाप्त होईल. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञान आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. 

महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा आणि आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मंगलदिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. आपल्याला घडवण्यात ज्यांचा हातभार लागला अशा प्रत्येक गुरुंना गुरुपौर्णिमेला वंदन करावे आणि या शुभेच्छा शेअर करा-

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा

जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही

जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही

तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि

आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,

अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली

तेथेचि मज पंढरी घडावी.

गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन

माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरूराया..

जे जे आपणासी ठावे,

ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करून सोडी,

सकळ जना..

तो ची गुरू खरा,

आधी चरण तयाचे धरा..

गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखवील वाट

आयुष्याचा पथ हा दुर्गम

अवघड डोंगर घाट

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला जगायला शिकवलं

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे

गुरुपौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,

मला भाग्यवंत समाधानी केलं..

असे माझे आई वडील, गुरुजन, नातेवाईक आणि ऊर्जादायी मित्र यांचा मी ऋणी आहे..!

असेच माझ्या पाठीशी उभे रहा, सोबत आशीर्वाद असू द्या,

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..

आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Whats_app_banner