Guru Purnima : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्यां केला जाण; हे गुरु-शिष्य नेहमी स्मरणात राहतील
मराठी बातम्या  /  धर्म  /  Guru Purnima : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्यां केला जाण; हे गुरु-शिष्य नेहमी स्मरणात राहतील

Guru Purnima : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्यां केला जाण; हे गुरु-शिष्य नेहमी स्मरणात राहतील

Updated Jul 21, 2024 03:31 PM IST

Guru Purnima 2024 : गुरु-शिष्य हा एक सुरेख संगम आहे, याची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून पाहायला मिळतात. जाणून घ्या या गुरु-शिष्य जोडींविषयी आणि त्यांना कायम स्मरणात ठेवा.

गुरुपौर्णिमा, गुरु शिष्य परंपरा
गुरुपौर्णिमा, गुरु शिष्य परंपरा

आज २१ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा असून ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. गुरु हे आपल्या जीवनात येणारे अनेक व्यक्ती असू शकतात. आपल्या जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही तरी शिकवण देऊन जात असतो. गुरुद्वारे मिळणारं ज्ञान अनेक माध्यमातून असू शकतं.

भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. आजच्या काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील. या गुरु आणि त्यांच्या शिष्यांना कायम स्मरणात ठेवलं आणि त्यांच्याविषयी सांगितलं जाईल.

गुरु-शिष्य हा एक सुरेख संगम आहे, याची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून पाहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि द्रोणाचार्य.गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी आपल्या पुढच्या पिढीलाही आपण गुरुपौर्णिमा साजरी करून ही उदाहरणे आणि यांच्या कथा सांगितल्या पाहिजे.

श्रीराम आणि गुरु वशिष्ठ

श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही गुरु होते. वेद, पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही अतूल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषिंमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

श्रीकृष्ण आणि गुरु सांदीपनी ऋषी

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकूल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. वेद-पुराण यांच्यासह धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली, असे सांगितले जाते. संदीपनी म्हणजे देवांचे ऋषी, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे.

कौरव-पांडव आणि गुरु द्रोणाचार्य

सर्व कौरव पांडव राजपुत्रांना घडवणारे द्रोणाचार्यही नेहमी गुरु पदावर राहतील आणि त्यांच्याविषयी नेहमी बोलले जाईल. कारण त्यांनी सर्व कौरव-पांडवांना शिकवले आहे. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्टिराला रथयुद्ध व नकुलसहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले.

संत एकनाथ महाराज आणि गुरु जनार्दन स्वामी

संत एकनाथ महाराज यांचे गुरू जनार्दन स्वामी होते. बालपाणी संत एकनाथ महाराज गुरूच्या शोधात निघाले तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी होय. जनार्दन स्वामी यांची दौलताबादेच्या किल्ल्यात संत एकनाथ महाराज यांच्या सोबत भेट झाली हीच गुरू शिष्य भेट होय. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात.

Whats_app_banner