मराठी बातम्या  /  धर्म  /  Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेचं महत्व काय?, कोणत्या देशात केली जाते साजरी?

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेचं महत्व काय?, कोणत्या देशात केली जाते साजरी?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 01, 2023 12:50 PM IST

Importance Of Guru Purnima : येत्या ०३ जुलै २०२३ रोजी गुरू पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वेदांचे संकलन करणारे आणि महाभारतासारख्या ग्रंथाचे लेखक वेद व्यास यांचा हा जन्मदिवस. हाच दिवस भारतात गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो

गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा (HT)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।

ट्रेंडिंग न्यूज

गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवेद नमः।।

अशा शब्दात गुरुंची महती सांगण्यात आली आहे. खरंतर माणसाला त्याच्या जन्मापासून आई आणि वडीलांच्या रुपात गुरु मिळतो. पुढे शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या रुपात हाच गुरु त्यांना सापडतो आणि तो गुरु त्यांना ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जातो. कालंतराने शाळामहाविद्यालयातून बाहेर पडल्यावर हीच व्यक्ती योग्य गुरु मिळावा यासाठी धडपड करत असते.

गुरुबिन ग्यान न होई, समझ मन ! ।।

स्वामी सीतारामदास ने बारबार समुझाई ।

यह योगी अति निर्भय प्रिय है,राम-उपासक भाई !

स्वामीजी मेरे ।।१।।

अशा शब्दात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही गुरुचा महिमा वर्णला आहे. येत्या ०३ जुलै २०२३ रोजी गुरू पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वेदांचे संकलन करणारे आणि महाभारतासारख्या ग्रंथाचे लेखक वेद व्यास यांचा हा जन्मदिवस. हाच दिवस भारतात गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते आणि साजरी केली जाते. महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या दिवसाची निवड केली असं सांगितलं जातं.

भारताशिवाय अन्य देशातही साजरी केली जाते गुरूपौर्णिमा

बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी पहिल्यांदा धर्माचं ज्ञान पाच भिख्खूंना दिलं. सारनाथ इथल्या कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना गौतम बुद्धांनी ज्ञान दिलं. बौद्ध इतिहासात याला धम्मचक्र परिवर्तन सूत्र या नावाने संबोधण्यात येतं आणि या पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखलं जातं. ज्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी या पाच भिख्खूमना ज्ञान दिलं तो दिवसही गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळेच या दिवशी आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशातल्या शाळांमध्ये गुरुप्रती विद्यार्थी आदर व्यक्त करतात. त्यांचे आशिर्वाद घेतात. शाळा, महाविद्यालयं किंवा आध्यात्मिक गुरु, कला किंवा विद्या शिकवणारे गुरु यांचं पूजन केलं जातं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

 

WhatsApp channel

विभाग