Guru Pradosh Vrat 2024 November: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. २८ नोव्हेंबर रोजी गुरु प्रदोष व्रताचा शुभ योगायोग तयार होत आहे. यासोबतच नोव्हेंबर महिन्यातील हे शेवटचे प्रदोष व्रतही असणार आहे. प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रतात सौभाग्य आणि शोभन योग निर्माण झाल्याने या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. सौभाग्य योग दुपारी ०४ वाजून ०२ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर शोभन योग सुरू होईल. ज्योतिषशास्त्रात सौभाग्य आणि शोभन योग अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या योगांमध्ये केलेले कार्य यशस्वी होते. गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजा आणि उपवासाची वेळ जाणून घेऊ या.
त्रयोदशी, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ३९ मिनिटांनी संपेल. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाची पूजा करण्याची उत्तम वेळ सायंकाळी ०५.२३ ते ०८.०५ अशी असेल. पूजेचा एकूण कालावधी ०२ तास ४२ मिनिटे इतका आहे.
प्रदोष व्रत पूजेचा सकाळ-संध्याकाळचा शुभ चोघडिया मुहूर्त
ज्योतिषशास्त्रात चोघडिया मुहूर्त पूजेसाठी शुभ मानला जातो. या काळात शुभ कार्य करणे लाभदायक असल्याचे मानले जाते.
शुभ - उत्तम : सकाळी ०६:५३ ते ०८:१२
लाभ - उन्नती : दुपारी १२:०८ ते ०१:२७
अमृत - सर्वोत्तम: दुपारी ०१:२७ ते ०२:४६
शुभ - उत्तम : दुपारी ०४:०४ ते ०५:२३
अमृत - सर्वोत्तम: ०५:२३ ते ०७:०४
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, प्रदोष व्रत दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर करावे. अशा प्रकारे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु प्रदोष व्रत पार पडेल. सकाळी ०६.५४ नंतर व्रत करणे शुभ राहील.
प्रदोष व्रतात भगवान शंकराची पूजा करण्याचा नियम आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि शेवटी शिवधाम प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.