Guru Pradosh Vrat 2024 November: मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी आणि गुरु प्रदोष व्रत एकाच दिवशी येण्याचा योगायोग होणार आहे. तसेच, नोव्हेंबर महिन्यातील हे शेवटचे प्रदोष व्रत असणार आहे. प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते. असेही मानले जाते की, प्रदोष व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि महादेव वमाता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतात. जाणून घ्या नोव्हेंबर महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत केव्हा आहे…
त्रयोदशी तिथी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि त्रयोदशी २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ३९ मिनिटांनी संपेल.
उदयतिथी वैध असल्याने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु प्रदोष व्रत पाळले जाईल.
प्रदोष व्रत पूजा मुहूर्त सायंकाळी ०५ वाजून २३ मिनिटांपासून ते ०८ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. या काळात प्रदोष काळ असेल. प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या काळात पूजा केल्याने शुभ फळ मिळते.
शुभ - उत्तम: सकाळी ०६:५३ ते ०८:१२
लाभ - उन्नती : दुपारी १२:०८ ते ०१:२७
अमृत - सर्वोत्तम : दुपारी ०१:२७ ते ०२:४६
शुभ - उत्तम : दुपारी ०४:०४ ते ०५:२३
अमृत - सर्वोत्कृष्ट : ०५:२३ ते ०७:०४
गुरु प्रदोष व्रत केल्याने कीर्ती, सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. व्यक्तीच्या शारीरिक सुखात वाढ होते. गुरुवारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व अधिक आहे. कारण, गुरुवार भगवान विष्णूला समर्पित आहे. अशा तऱ्हेने या दिवशी भगवान शिवासह भगवान विष्णूचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.