Guru Pradosh vrat 2024: वर्षभराच्या काळात एकूण २४ प्रदोष व्रत आहेत. दर महिन्याला प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीला म्हणजेच शुक्ल पक्ष त्रयोदशीला आणि चंद्र महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशीला पाळले जाते. या व्रतामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. गुरुवारी पाळला जाणारा प्रदोष हा गुरु प्रदोष व्रत म्हणून ओळखला जातो. या व्रतामध्ये लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. नोव्हेंबर महिन्यातील गुरु प्रदोष व्रत कार्तिक कृष्ण त्रयोदशीला, अर्थात गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत प्रदोष व्रताची पूजा वेळ आणि भगवान शिवाला काय अर्पण करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल...
गुरु प्रदोष व्रत हे कार्तिक कृष्ण त्रयोदशीला, आर्थात गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल. हे व्रत दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ वाजून ३९ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीमुळे २८ नोव्हेंबर रोजी उपवास करण्यात येणार आहे. पूजेची वेळ संध्याकाळी ०५ वाजून २४ मिनिटांपासून ते ०८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत असेल.
भगवान शंकराला कोणता भोग आवडतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
> भोग चढवत असताना भगवान शंकराला सुका मेवा अर्पण करावा. यामुळे आर्थिक समस्या सुटू शकतात असा विश्वास आहे.
> खीर, बटाट्याची खीर, दही आणि तूपही देऊ शकता. यामुळे मुलाला आनंद मिळेल.
> भगवान शंकराला पांढरी बर्फीही देऊ शकता, यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
> तुम्ही महादेवाला धोतराही अर्पण करू शकता.
सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर भगवान शंकराचे ध्यान करून व्रत करण्याचा संकल्प करावा. भगवान शिवासोबत देवी पार्वतीचीही पूजा करणे आवश्यक आहे. पूजेदरम्यान धोतरा, बेलपत्र, फळे आणि मिठाई अर्पण करावी. धूप आणि मातीच्या दिव्याने त्यांची आरती करावी. नंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी. शेवटी शिवाची आरती करून त्याला भोग अर्पण करावा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.