Guru Nanak Jayanti Wishes : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा असून, या दिवशी मोठ्या थाटामाटात गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाईल. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे.
गुरु नानक देव लहानपणापासूनच धार्मिक स्वभावाचे होते. त्यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतले. आजही लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात. गुरु नानक जयंतीच्या दिवशी गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरु नानक जयंती निमित्त आपल्या प्रियजणांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवून दिवसाचा आनंद द्विगुणीत करा.
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी
त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
...
जगाला एकता, श्रद्धा आणि
प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
...
तुमची जन्मोजन्मी साथ मिळो
सर्वांजवळ आनंदाची वार्ता असो
जीवनात कोणती अडचण आली तरी
नेहमी गुरु नानक देवाच आशीर्वाद लाभो
गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा
...
शीख बांधवांचे गुरु,
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !
...
जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
...
वाहेगुरु जी का खालसा
वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या
मन:पूर्वक शुभेच्छा!
...
या जगाच्या मोह-मायेपासून लांब राहो
वाहे गुरुच्या कृपेने आनंदाचे क्षण लाभो, हीच प्रार्थना
गुरु नानक जयंती निमित्त सर्वांना भरपूर शुभेच्छा
…
इक ओंकार सतनाम करता पुरख
निर्मोह निरवैर अकाल मूरत...
गुरू नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
असे म्हणतात की नानक देवांना सांसारिक कार्यात रस नव्हता. ते सदैव भगवंताची भक्ती आणि सत्संगात मग्न असत. हे समर्पण पाहून लोक त्यांना दैवी पुरुष म्हणू लागले. शीख धर्माचे मुख्य धार्मिक स्थळ म्हणजे गुरुद्वारा हे गुरू नानकजींनी आपले कुटुंब सोडून भारतासह अनेक देशांमध्ये प्रवास करून धार्मिक एकतेची शिकवण सर्वत्र पसरवली.