Guru Nanak Jayanti 2024: गुरू नानक जयंती हा शीख धर्माचा प्रमुख सण आहे. याला गुरू नानक देव यांचा प्रकाश पर्व असेही म्हणतात. गुरू नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दिवाळीनंतर १५ दिवसांनी गुरू नानक जयंती येते. गुरू नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू होते. गुरू नानक जयंतीला शीख धर्माला मानणारे लोक भजन-कीर्तन आणि लंगर इत्यादी करतात. या दिवशी गुरुद्वारामध्ये भक्ती आणि सेवा सुरू असते. जाणून घ्या गुरू नानक जयंती कधी आहे
गुरू नानक जयंती १५ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार रोजी आहे. यावर्षी गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आहे. गुरु नानक जयंती ला प्रकाश पर्व असेही म्हणतात.
शिखांचे पहिले गुरू गुरू नानक देव यांनी एक ओंकारचा नारा दिला. म्हणजे देव एकच आहे. इक ओंकार हे शीख धर्माच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे, याचा अर्थ एकच सर्वोच्च शक्ती आहे.
गुरु नानक देव यांचा जन्म १४६९ साली झाला. पौर्णिमेची तिथी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ०२ वाजून ५८ मिनिटांनी संपेल.
नानक देव यांचे खरे नाव नानक होते. त्यांचे टोपणनाव बाबा नानक होते. नानक देव यांना मानणारे त्यांना बाबा नानक, नानक देव किंवा गुरु नानक देव म्हणून संबोधतात.
ईश्वर माणसाच्या हृदयात राहतो हा गुरू नानक यांचा संदेश आहे. कधीही कोणाचे अधिकार हिरावून घेऊ नयेत, तर कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे गरजूंना मदत करावी.
गुरु नानक जयंतीचे शिख धर्मीयांसाठी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शीख धर्माचे पहिले गुरू मानले जाणारे गुरू नानक देव यांचे जीवन आणि शिकवण यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरू नानक देव यांनी नेहमीच समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर भर दिला. या दिवशी लोक जात-धर्माचा विचार न करता सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुतेची भावना अंगीकारण्याचा संकल्प करतात. गुरू नानक देव यांनी “नाम जपो, किरत करो, वंद छको” म्हणजेच देवाचे नामस्मरण करा, प्रामाणिकपणे काम करा आणि गरजूंना वाटून खा, असा संदेश दिला. हा सण त्यांनी आपल्या जीवनात प्रस्थापित केलेल्या निःस्वार्थ सेवेची आणि मानवतेबद्दलच्या प्रेमाची भावना साजरी करण्याचा आणि अंमलात आणण्याचा एक पवित्र संधी आहे.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.