Guru Govind Singh Jayanti : शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांची जयंती दरवर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला साजरी केली जाते. गुरु गोविंद सिंग यांचा आज ३५८ वा प्रकाश पर्व आहे. गुरु गोविंद सिंग शौर्य आणि धैर्याचे प्रतीक होते. गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहिब पूर्ण केले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया संत नामदेव आणि गुरू ग्रंथ साहिब यांचा परस्पर संबंध.
गुरु गोविंदसिंग हे शिखांचे दहावे गुरू होते. गुरु गोविंद सिंग यांनी अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढण्यासाठी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. असे म्हटले जाते की, एके दिवशी सर्व लोक जमले तेव्हा गुरु गोविंदसिंग यांनी अशी मागणी केली की शांतता पसरली. सभेला उपस्थित लोकांनी गुरु गोविंद यांच्याकडे डोके मागितले. त्यानंतर एकापाठोपाठ पाच जण उठले आणि म्हणाले की, हे घ्या डोके. तंबूच्या आत नेताच तिथून रक्ताचा धारा वाहू लागला. हे पाहून बाकीच्या लोकांचे मन अस्वस्थ झाले. अखेर गुरु गोविंदसिंग जेव्हा एकटेच तंबूत गेले आणि परतले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्यासोबत पाच ही तरुण नवे कपडे व पगडी घालूण हजर होते. गुरु गोविंदसिंग त्यांची परीक्षा घेत होते. गुरु गोविंद यांनी या पाच तरुणांना आपला पंच प्यारा असे संबोधले आणि येथेच खालसा पंथाची स्थापना झाली. खालसा चा अर्थ शुद्ध आहे.
गुरु गोविंदसिंग हे लेखकही होते, त्यांनी स्वत: अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांच्या दरबारात नेहमी ५२ कवी व लेखकांची उपस्थिती असायची, म्हणून त्यांना 'संत सिपाही' असेही संबोधले जायचे, असे म्हटले जाते. गुरु गोविंदसिंग ज्ञान, लष्करी क्षमता इत्यादींसाठी ओळखले जातात. गुरु गोविंदसिंग संस्कृत, फारसी, पंजाबी आणि अरबी भाषाही शिकले. त्याचबरोबर धनुष्यबाण, तलवार, भाला चालविण्याची कलाही त्यांनी शिकली.
माहितीनुसार, गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या पदाचांही समावेश करण्यात आला आहे. गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची तब्बल ६१ पदं आहेत. गुरू नानक साहिब यांच्या अगोदर ज्यांची-ज्यांची पदं समाविष्ट करण्यात आली, त्यात सर्वाधिक पदं संत नामदेवांची आहेत. संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहिले आहेत. संत नामदेवांचं मूळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे. आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात असे म्हणतात.
संबंधित बातम्या