Guru Govind Singh Jayanti 2024 Wishes Messages Quotes : गुरू गोविंदसिंह जयंती उद्या, १७ जानेवारी रोजी साजरी केली जात आहे. हा दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना साहिब येथे झाला. मात्र, तिथीनुसार त्यांचा जन्म पौष शुक्ल सप्तमीला झाला. यामुळे त्यांची जयंती डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येते.
गुरू गोविंद सिंह यांच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादूर आणि आईचे नाव गुजरी होते. वडील तेग बहादूर हे शिखांचे ९ वे गुरू होते. वडील तेग बहादूर यांच्या बलिदानानंतर गुरू गोविंद सिंह यांनी वयाच्या ९ व्या वर्षी सिंहासन स्वीकारले. अशा प्रकारे ते शिखांचे १० वे गुरू बनले. गुरू गोविंद सिंह हे लहानपणापासूनच एक शूर आणि कुशल योद्धा होते. आपल्या नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना या शुभेच्छा पाठवून जयंती उत्सव साजरा करा.
जीवन तुझ्या कृपेवर अवलंबून आहे
कोणतीही अडचण आली की,
तू मला मार्ग दाखव
गुरु गोविंदसिंह जयंतीच्या लाखो शुभेच्छा
...
वाहे गुरुंचा आशीर्वाद तुम्हाला मिळो
अशी प्रार्थना माझी,
गुरुंच्या कृपेने घरो-घरी वसो आनंद
याच सदीच्छा
गुरु गोविंद सिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
...
आनंद आणि तुमचा जन्मो जन्मी साथ असो,
सर्वांच्या मुखात तुमचाच उद्धार राहो,
जीवनात कोणत्याही अडचणी आल्या तर..
तुम्हाला गुरु गोविंदसिंहचा आशीर्वाद मिळो
गुरु गोविंदसिंह जयंती निमीत्त शुभेच्छा
...
भै काहू को देत नहि,
नहि भय मानत आन
गुरुच्या कृपेने कोणत्याही व्यक्तिला
परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही
गुरु गोविंदसिंह जयंतीच्या शुभेच्छा
...
सतगुरु सब दे काज संवारे
तुम्हाला दहाव्या शिख गुरु
गोविंद सिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
युद्धाचा जेव्हा वाजवत असत ते बिगुल
घाबरून पळून जायचे तेव्हा मुघल
ज्यांनी नेहमी सत्याचे केले समर्थन
त्या गुरूंची सदैव असो आपल्यावर कृपा
गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त अनेक शुभेच्छा.