हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि शश राजयोग असे शुभ संयोग घडत आहे. तसेच रेवती व अश्विनी नक्षत्राचाही संयोग राहील. यादिवशी चंद्र गुरुच्या मीन राशीत राहील. तर शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान राहतील आणि शश राजयोग निर्माण करतील.
यावर्षी विक्रम संवत २०८१ प्रारंभ होईल ज्याचा राजा मंगळ आणि मंत्री शनी राहील. या संवत्सरचे नाव पिंगला असून, पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते.
तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ यावर्षाचा राजा आहे. हिंदू नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला पगारवाढ, पदोन्नती देतील. तुम्ही एखाद्या आजारामुळे चिंतेत असाल तर तो आजार बरा होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल. वाहन खरेदी करून घ्या.
तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र शनी मित्र राशी आहे. शनि या वर्षी मंत्री आहेत. तुम्हाला नव संवत्सर लाभदायक ठरेल कारण तुमच्या राशीत गुरु ग्रहाचे भ्रमण राहील. कामकाजात यश मिळेल. धर्म आणि कर्मात मन रमेल. तुम्हाला खास भेट मिळेल. तुमच्यासाठी कार खरेदीचे खास योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींसाठी हिंदू नववर्षाची सुरुवात खूप फलदायी असेल. व्यावसायिकांसाठी हा कालावधी चांगला आहे. त्यांना अनेक नवीन डील्स मिळतील. भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे. त्यांची बदली होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेनं भरपूर लाभ मिळेल.
तुमच्या राशीचा स्वामी शनि आहे आणि शनि यावर्षाचा मंत्री ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होत आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात मन रमेल. अडचणी दूर होऊन यश मिळेल. या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी कराल. गुंतवणुकीसाठी कालावधी चांगला आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराकडून शुभवार्ता मिळेल.