हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. या दिवसापासून शके १९४६ आणि नव संवत्सर २०८१ प्रारंभ होईल. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. गुढीपाडवा म्हणजे हिंदुनववर्ष सर्वांना शुभ जाओ आणि अडचणीमुक्त राहो यासाठी हे खास शुभेच्छा देऊया.
नवंवर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
…
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
…
सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
…
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
…
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
…
तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
गुडीपाडवा खूप खूप शुभेच्छा.
…
दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं पण
प्रेमाचे बंध कायम राहतात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
…
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
…
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
…
श्रीखंडपुरीची लज्जत,
गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाचदा आणि सौख्याचा
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.