नोव्हेंबर ग्रह गोचर २०२४ : नोव्हेंबर महिना ग्रहनक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलतील, ज्याचा परिणाम मेष राशीपासून मीन राशीत होईल. ज्योतिषीय गणनेनुसार नोव्हेंबरमध्ये रवि, गुरू, शुक्र आणि बुध आपली स्थिती बदलणार आहेत. या ग्रहांचा प्रभाव काही राशींवर अत्यंत शुभ तर काहींसाठी नकारात्मक असणार आहे. जाणून घ्या नोव्हेंबर मध्ये ग्रहांची स्थिती बदलल्याने कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल
गुरु नक्षत्र संक्रमण नोव्हेंबर २०२४ : देवगुरु गुरू २८ नोव्हेंबर रोजी मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतील. गुरू नक्षत्राचे संक्रमण दुपारी ०१ वाजून १० मिनिटांनी होईल. गुरूच्या नक्षत्र बदलाचा शुभ परिणाम मेष, मिथुन, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांवर होईल. गुरूच्या प्रभावामुळे आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहेत.
बुध संक्रमण नोव्हेंबर २०२४ : ग्रहांचा राजकुमार बुध २६ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. हे संक्रमण सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी होणार आहे. कर्क, कन्या, धनु, मकर आणि मीन राशींवर बुधाचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. यानंतर ३० नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत अस्त होईल. बुध रात्री ०८ वाजून २० मिनिटांनी अस्त होईल. मेष, सिंह, धनु आणि वृश्चिक राशींवर बुधाचा सर्वाधिक प्रभाव राहील. या काळात या राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा सल्ला दिला जातो.
शुक्र संक्रमण नोव्हेंबर २०२४ : शुक्र ७ नोव्हेंबर २०२४, गुरुवार पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. मेष, वृषभ, सिंह, तुळ, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल.
सूर्य संक्रमण नोव्हेंबर २०२४ : सूर्य १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ परिणामी राहील. या काळात नोकरी, व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील.
शनी मार्ग नोव्हेंबर २०२४ : नोव्हेंबरमध्ये शनी राशी बदलणार नाही तर आपली चाल बदलेल. शनी सध्या वक्री म्हणजेच उलट गतीने वाटचाल करीत आहे. १५ नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहे म्हणजेच सरळ चाल सुरू करेल. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी शनी आपल्या मूळ राशीत कुंभ राशीत भ्रमण करेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)