Good Morning wishes: 'आयुष्य सुंदर आहे,तुझा हात हातात आहे'... या गोड संदेशाने प्रिजनांना म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning wishes: 'आयुष्य सुंदर आहे,तुझा हात हातात आहे'... या गोड संदेशाने प्रिजनांना म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning wishes: 'आयुष्य सुंदर आहे,तुझा हात हातात आहे'... या गोड संदेशाने प्रिजनांना म्हणा गुड मॉर्निंग

Published Oct 30, 2024 08:45 AM IST

Good Morning Status: जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message

Good Morning Marathi Message:  कुणालाही चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

 

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच

पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या

झाडावर चढण्याच्या क्षमतेवर

करू लागलात तर तुम्ही

सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.

 

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.

तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील

एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

 

शुभ सकाळ

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.

तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात

तर दुर्बळ बनाल

आणि सामर्थ्यशाली समजलात

तर सामर्थ्यशाली बनाल.

 

शुभ सकाळ

सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.

तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

शुभ सकाळ

फुले नेहमी फुलत राहतात,

ज्योत अखंड तेवत राहते.

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात,

त्यांना जोडा आणि आनंदी राहा

 

शुभ सकाळ

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात

नाजूक उन्हाची प्रेमळ साथ

मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल

अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ

 

शुभ सकाळ

रात्र ओसरली दिवस उजाडला

तुला पाहून सुर्यही चमकला

लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली

तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली

 

शुभ सकाळ

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात फिरताना सावलीची गरज असते

जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते

माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ

 

शुभ सकाळ

नवा दिवस नवी सुरूवात

नवी प्रेरणा आणि तुझी साथ

आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे

परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे

शुभ सकाळ

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय

पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय

माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवलाय

कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय

Whats_app_banner