Good Morning Marathi Message: इतरांना चांगले संदेश पाठवल्याने तुमच्याही मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. तुमचाही दिवस उत्सहात जातो. शिवाय तुमच्यातील नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते. आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही दिलासा मिळतो. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेले सकाळचे शुभेच्छा संदेश नक्कीच पाठवा.
''नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..''
''जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”
पुरेसा असेल तर “सुखाचा चेक”
कधीच “बाउंस” होणार नाही.''
''कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..''
सुप्रभात!
''मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात''
गुड मॉर्निंग!
''माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.''
शुभ सकाळ!
''मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी
त्या आवश्यक आहे.''
शुभ सकाळ!
''नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.''
सुप्रभात!
''नात… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.''
शुभ सकाळ!
''ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.''
गुड मॉर्निंग!
''सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.''
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या