Good Morning Marathi Message: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता. चला तर मग पाहूया...
नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
नात… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
शुभ सकाळ!
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
गुड मॉर्निंग!
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे.
शुभ सकाळ!
नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे
सुप्रभात!
यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते.
जेव्हा तुम्ही जिंकू लागता,
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.
शुभ सकाळ!
राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली
सर्व चांगली लक्षण घेऊन जातो,
संयमसुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी कायमची
चांगली लक्षण घेऊन येतो.
फक्त निवड कोणाची करायची
हे आपणंच ठरवायचे आहे.
गुड मॉर्निंग!
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
शुभ सकाळ!
सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी.
सुप्रभात!