Good Morning Marathi Message: या धावपळीच्या जगात चिंता आणि ताणतणाव सामान्य गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. म्हणूनच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती आणि मित्र सकाळी लवकर आपल्याला काही मौल्यवान संदेश पाठवतात. अशा वेळी तुम्हालाही एखाद्याच्या दिवसाची सुरुवात आनंदी करायची असेल. तर तुम्हीसुद्धा त्यांना सुंदर सुंदर शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. तुमच्या प्रियजनांना संदेश पाठवण्यासाठी आम्ही काही खास संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत..
''आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..''
''शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात''
''आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…''
शुभ सकाळ!
''रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.''
शुभ प्रभात!
''जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..''
शुभ सकाळ!
''प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.''
शुभ सकाळ !
''आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..''
शुभ सकाळ!
''जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..''
शुभ सकाळ!
''जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…''
शुभ सकाळ!
''पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…''
गुड मॉर्निंग!