Good morning message In Marathi: प्रत्येक नवीन सकाळ ही सकारात्मकतेचे आणि नवीन सुरुवातीचे लक्षण असते. जीवनाचा किंवा वयाचा कोणताही पैलू असो, मानव नेहमीच सकारात्मकतेच्या शोधात असतो. रात्रीच्या एकाकीपणाला छेद देणारी सकाळची किरणे व्यक्तीला नवीन उर्जेने भरू शकतात. दररोज एक नवीन सकाळ तुम्हाला नवीन बदल घडवून आणण्याची प्रेरणा देते. मराठीमध्ये गुड मॉर्निंग कोट्स वाचून, तुम्ही तुमचा दिवस प्रेरणा आणि सकारात्मकतेने सुरू करू शकता. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, तुम्ही सकाळी लवकर चांगले विचार वाचले पाहिजेत.
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
शुभ सकाळ!
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!
पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
सुप्रभात!
आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!
नाही कुणाचे फेकलेले मिळू दे,
नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे,
मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे,
हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,
मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.”
गुड मॉर्निंग!
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही
शुभ सकाळ!
मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात..
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या