Good Morning Wishes In Marathi: सध्या सोशल मीडियाच्या जगात बहुतांश लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी संदेश पाठवणे आवडते. अनेक लोक फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस ठेऊन एकमेकांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा देतात. आपल्या आवडत्या व्यक्तीचा संदेश याहूनच त्या व्यक्तीचा दिवस यशस्वी होतो. त्यामुळे हे संदेश इतके खास असले पाहिजेत की ते समोरच्या व्यक्तीला आयुष्यात उपयोगी पडतील. तुम्हाला जीवनात इतरांना प्रेरणा द्यायची असेल तर या अप्रतिम ओळींसह सुप्रभात म्हणा. जेणेकरून त्यांचा संपूर्ण दिवस काहीतरी खास करण्यात खर्च होवो.
1)आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ!
2) आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
सुप्रभात!
3)या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!
4)मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते.
गुड मॉर्निंग!
5)समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे….
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
सुप्रभात!
6)कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!
7)तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
सुप्रभात!
8)जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!
9)आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा…
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा…
शुभ सकाळ!
10)सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
सुप्रभात!