Morning Wishes: प्रियजनांच्या आठवणीने करा दिवसाची गोड सुरुवात! 'हे' मराठी संदेश ठरतील उपयोगी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Morning Wishes: प्रियजनांच्या आठवणीने करा दिवसाची गोड सुरुवात! 'हे' मराठी संदेश ठरतील उपयोगी

Morning Wishes: प्रियजनांच्या आठवणीने करा दिवसाची गोड सुरुवात! 'हे' मराठी संदेश ठरतील उपयोगी

Published Aug 10, 2024 05:09 AM IST

Good Morning Wishes: तुमचे डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात याची जाणीव करून द्या.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi (Pixabay)

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची गोड सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण आवर्जून करून द्या. तुमचे डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात याची जाणीव करून द्या. यासाठी, सकाळी उठल्याबरोबर एक प्रेमळ संदेश पाठवणे पुरेस आहे. डोळे उघडताच जेव्हा तुमची जवळची व्यक्ती त्याचा मोबाइल पाहील तेव्हा तुमचा संदेश त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणेल. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल.

गुड मॉर्निंग मराठी संदेश

''तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..''

शुभ सकाळ !

 

''मनातून येणा-या आठवणी,

कोणीतरी समजणारं असावं..

जीवनात सुख:दुखात साथ देणारं,

एक सुंदर नातं असावं..''

शुभ सकाळ!

 

''हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..''

शुभ सकाळ!

 

''मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..''

शुभ सकाळ !

 

''कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…''

शुभ सकाळ!

 

''यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.''

सुप्रभात!

''धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.''

शुभ सकाळ!

 

''स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.''

शुभ सकाळ!

 

''मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…''

शुभ सकाळ!

 

''छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.''

गुड मॉर्निंग!

 

 

 

Whats_app_banner