Good Morning Marathi Message: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे.
नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
शुभ सकाळ!
नातं… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
शुभ सकाळ!
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
सुप्रभात!
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!
सुखासाठी जे काही कराल
त्यात आनंद मिळेलच असे नाही
परंतु आनंदाने जे काही कराल
त्यात सुख नक्की मिळेल.
सुप्रभात!
नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे…
गुड मॉर्निंग!
राग आल्यावर थोडं थांबलं
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.
शुभ सकाळ!
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…
शुभ सकाळ