Shubh Sakal marathi message: रोज सकाळी जेव्हा कोणी तुम्हाला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना काही अद्भुत आणि गोड संदेशांच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायची असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि रोमँटिक संदेश घेऊन आलो आहोत.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ !
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
शुभ सकाळ!
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
शुभ सकाळ!
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
शुभ सकाळ!
कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात.
शुभ सकाळ!