Good Morning Wishes:'या' सुंदर संदेशासह प्रियजनांना म्हणा 'गुड मॉर्निंग', दिवस होईल खास-good morning wishes say good morning to loved ones with this beautiful message make the day special ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes:'या' सुंदर संदेशासह प्रियजनांना म्हणा 'गुड मॉर्निंग', दिवस होईल खास

Good Morning Wishes:'या' सुंदर संदेशासह प्रियजनांना म्हणा 'गुड मॉर्निंग', दिवस होईल खास

Sep 28, 2024 08:21 AM IST

Good Morning Marathi Status: तुम्हीसुद्धा तुमच्या प्रियजनना असेच मेसेज पाठवण्यास उत्सुक असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर मेसेज घेऊन आलो आहोत.

Good Morning Marathi Status
Good Morning Marathi Status (pixabay)

Good Morning Wishes Marathi:  सकाळी- सकाळी तुमची प्रिय व्यक्ती जर तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात खूप छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी अद्भुत आणि सुंदर संदेश शोधतात. तसेच व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, फेसबुक अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून त्यांच्या दिवसाची सुरुवात गोड करत असतात. तुम्हीसुद्धा तुमच्या प्रियजनना असेच मेसेज पाठवण्यास उत्सुक असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर मेसेज घेऊन आलो आहोत.

 

गुड मॉर्निंग मराठी मेसेज-

 

''मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला

कोणत्याही नावाची गरज नसते.

न सांगता जुळणाऱ्या नात्यांची

परिभाषा काही वेगळीच असते.''

 

''सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ''.

 

''कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.''

शुभ सकाळ !

 

''सगळ्यांनी साथ सोडली,

तेव्हा माणुसकी कळली,

पावसात गरमा गरम चहा प्यायलो,

तेव्हा आयुष्याची मजा कळली

पैसे नसताना वेगळी किंमत,

पैसे असताना वेगळी किंमत,

तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली.''

शुभ सकाळ!

 

''सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..

पण सत्य कधीच हरत नाही''

गुड मॉर्निंग!

 

''प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,

चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…

आपण जरी भेटत नसु दररोज,

पण आपले चांगले विचार नेहमी

नक्की भेटत राहतील एकमेकांना…

माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,

अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!

जगण्यासाठी लागतात फक्त,

“प्रेमाची माणसं”

अगदी तुमच्यासारखी…!!''

शुभ सकाळ!

''हळवी असतात मने,

जी शब्दांनी मोडली जातात..

अन शब्दच असतात जादूगार,

ज्यांनी माणसे जोडली जातात…''

शुभ सकाळ!

 

''फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर

कोणी शंका घेत असेल तर

मुळीच कमीपणा वाटू देवू नका.

कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही.''

शुभ सकाळ!

 

''चांगली माणस आपल्या जीवनात

येणं हे आपली “भाग्यता ” असते.

आणि त्यांना आपल्या जीवनात

जपुन ठेवणं हे आपल्यातली

“योग्यता ” असते.''

सुप्रभात!

''प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.

तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.

मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.

तशी मोजकीच माणसं असतात

“क्षणोक्षणी आठवणारी”

जसे तुम्ही.

शुभ सकाळ!

Whats_app_banner
विभाग