Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी.
मैत्री ही नेहमी गोड असावी ,
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,
सुखात ती हसावी , दुखात ती रडावी,
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी.
शुभ सकाळ
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
गुड मॉर्निंग
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
शुभ सकाळ
श्वासातला श्वास असते मैत्री...
ओठातला घास असते मैत्री...
काळजाला काळजाची आस असते मैत्री....
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री...
गुड मॉर्निंग
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात
खर तर ही मैत्रीची नाती अशीच असतात
आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.
शुभ सकाळ
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री …फ़क्त मैत्री……
गुड मॉर्निंग
बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
संबंधित बातम्या