Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनीच करावी. कारण असे काही विचार असतात जे एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा देतात. त्यामुळे जेव्हा आपण हे विचार आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतो, तेव्हा त्यांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडतील अशी आशा करतो. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात सुंदर करण्यासाठी चांगल्या आणि अद्भुत कल्पना शोधत असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही सुंदर संदेश आहेत. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाला पाठवून त्यांचा दिवस गोड बनवू शकता...
''मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे''
''नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो''
''मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी''
शुभ सकाळ!
''आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही''
शुभ सकाळ!
''चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी''
सुप्रभात!
''देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय''
सुप्रभात!
''चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये''
सुप्रभात!
''छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो''
गुड मॉर्निंग!!!
''नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवायव आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही''
शुभ सकाळ!
''मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते''
शुभ सकाळ!