Good Morning Messages In Marathi: जर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असाल आणि आपल्या प्रियजनांनी देखील त्यांची स्वप्ने लवकर पूर्ण करावीत, अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना प्रेरित करण्यासाठी तुम्ही हे प्रेरणादायी गुड मॉर्निंग संदेश सकाळी पाठवू शकता. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये. ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच, आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते. आयुष्यातील प्रत्येक क्षणी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हे सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी गुड मॉर्निंग संदेश घेऊन आलो आहोत. ते वाचून दिवसाची सुरुवात केल्यास तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल, शिवाय तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवी ऊर्जा आणि प्रेरणाही मिळेल.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
पण मनाने हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
त्यामुळे जिंकण्याची जिद्द मनात कायम ठेवा!
-------------------------------
माणसाच्या मुखात गोडवा, मनात अपुलकी,
वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असलं की,
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात!
शुभ प्रभात
-------------------------------
नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण,
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते!
शुभ सकाळ
-------------------------------
देव माझा सांगून गेला
पोटा पुरतेच कमव,
जिवाभावाचे मित्र मात्र
खूप सारे जमव!
-------------------------------
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय, लोक तर
देवात पण चुका काढतात!
सुप्रभात
-------------------------------
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे की,
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे!
शुभ सकाळ
-------------------------------
मंदिरातील घंटेला आवाज नाही,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही,
कवितेला चाल नाही,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही,
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही!
शुभ सकाळ
-------------------------------
मन वळू नये, अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी
कधी विसरु नये, अशी नाती हवी!
सुप्रभात
संबंधित बातम्या