Good Morning Wishes : दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा...दिवसाची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा...दिवसाची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी!

Good Morning Wishes : दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा...दिवसाची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी!

Dec 25, 2024 07:42 AM IST

Good Morning Wishes In Marathi : शुभ सकाळ म्हटल्याने दिवस चांगला जातो आणि तुमचे मनही प्रसन्न राहते. येथे काही बेस्ट गुड मॉर्निंग मॅसेज आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी पाठवू शकता.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Wishes Messages In Marathi: आजकाल प्रत्येक जण अंथरुणावरून उठण्यापूर्वीच अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी आपल्या फोनकडे पाहतो. बहुतेक लोकांच्या रुटीनमध्ये सकाळची ही पहिली गोष्ट असते. फोन पाहताना तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका खास मॅसेजने करू शकता. यामुळे दिवस चांगला जातो आणि तुमचे मनही प्रसन्न राहते. येथे काही बेस्ट गुड मॉर्निंग मॅसेज आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी पाठवू शकता.

दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा.

तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील

एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

शुभ सकाळ

 

 

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.

तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल,

आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.

 

 

सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.

तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

शुभ सकाळ

 

 

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

सुप्रभात

 

 

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,

कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने

प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.

पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.

मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते,

या जगात नाते तर सर्वच जोडतात.

पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते.

शुभ सकाळ

 

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.

शुभ सकाळ

 

 

दिवा कधीच बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका

चांगले कर्म करत रहा

तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.

शुभ सकाळ

 

 

माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

 

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

Whats_app_banner