Good Morning Wishes Messages In Marathi: आजकाल प्रत्येक जण अंथरुणावरून उठण्यापूर्वीच अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी आपल्या फोनकडे पाहतो. बहुतेक लोकांच्या रुटीनमध्ये सकाळची ही पहिली गोष्ट असते. फोन पाहताना तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका खास मॅसेजने करू शकता. यामुळे दिवस चांगला जातो आणि तुमचे मनही प्रसन्न राहते. येथे काही बेस्ट गुड मॉर्निंग मॅसेज आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी पाठवू शकता.
प्रत्येक सकाळ एक नवीन आशीर्वाद आहे,
आयुष्य आपल्याला दुसरी संधी देते
कारण आपण त्यास पात्र आहात.
तुम्हाला फ्रेश मॉर्निंगच्या हार्दिक शुभेच्छा!
------------------------------------
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
पण मनाने हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
त्यामुळे जिंकण्याची जिद्द मनात कायम ठेवा!
शुभ सकाळ
------------------------------------
माणसाच्या मुखात गोडवा, मनात अपुलकी,
वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असलं की,
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात!
शुभ प्रभात
------------------------------------
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते!
शुभ सकाळ
------------------------------------
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ!
------------------------------------
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे…
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात!
------------------------------------
स्वभाव अशी गोष्ट आहे, जो एखाद्या व्यक्तीला सर्वांचा प्रिय बनवते,
कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते,
म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे!
शुभ सकाळ
------------------------------------
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो,
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील!
------------------------------------
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!