Good Morning Wishes: माणसाला माणुसकीने जिंकायचे! सकाळची सुरुवात करा ‘या’ खास प्रेरणादायी संदेशांनी-good morning wishes marathi start the morning with these special inspirational messages ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: माणसाला माणुसकीने जिंकायचे! सकाळची सुरुवात करा ‘या’ खास प्रेरणादायी संदेशांनी

Good Morning Wishes: माणसाला माणुसकीने जिंकायचे! सकाळची सुरुवात करा ‘या’ खास प्रेरणादायी संदेशांनी

Sep 01, 2024 07:37 AM IST

Good Morning Wishes Marathi: आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

Good Morning Wishes: माणसाला माणुसकीने जिंकायचे! सकाळची सुरुवात करा ‘या’ खास प्रेरणादायी संदेशांनी
Good Morning Wishes: माणसाला माणुसकीने जिंकायचे! सकाळची सुरुवात करा ‘या’ खास प्रेरणादायी संदेशांनी (Shutterstock )

Good Morning Wishes Marathi: दूर राहत असलेल्या आपल्या प्रियजनांना हे छान आणि सुंदर गुड मॉर्निंग संदेश पाठवून आपण आपली काळजी आणि प्रेम व्यक्त करू शकता. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर, आपला संपूर्ण दिवस आनंदी जाऊ शकतो. याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

 

मनाला भावनेने जिंकायचे,

रागाला प्रेमाने जिंकायचे,

अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे,

अपयशाला धीराने जिंकायचे,

संकटांना धैर्याने जिंकायचे आणि,

माणसाला माणुसकीने जिंकायचे!

 

-----------------------------

 

पाहटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला,

तुमची आठवण येत आहे, असा निरोप देऊन गेला

शुभ सकाळ

 

-----------------------------

 

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही,

पान उलटले की जुने काही आठवत नाही,

आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण,

आपल्या आस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.

शुभ सकाळ

 

-----------------------------

 

कमावलेली नाती आणि जिंकलेले मन,

ज्याला सांभाळता येते,

तो आयुष्यात कधीच हरत नाही.

शुभ सकाळ

 

-----------------------------

 

आपल्या राशीवर नाही, तर आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा,

रास तर राम आणि रावणाची पण एकच होती,

पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसारच फळ दिलं!

सकाळच्या सुंदर शुभेच्छा!

 

-----------------------------

 

वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही,

कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात,

आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात,

वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देते!

शुभ सकाळ

 

-----------------------------

 

जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील,

तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे,

काहीही आपलं नाही,

काहीही आपलं नव्हतं आणि

काहीही आपलं राहणार नाही!

गुड मॉर्निंग

 

-----------------------------

 

दिवा कधीच बोलत नाही,

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका,

चांगले कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील!

 

-----------------------------

 

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,

माफी मागून नाती जपा,

कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,

आपल्या जिवाभावाची माणसच साथ देतात.

शुभ सकाळ

विभाग