Good Morning Wishes: ‘जन्माची नाती हा ईश्वराचा प्रसाद...’; आप्तस्वकीयांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज-good morning wishes marathi send this special good morning message to your loved ones ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ‘जन्माची नाती हा ईश्वराचा प्रसाद...’; आप्तस्वकीयांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Wishes: ‘जन्माची नाती हा ईश्वराचा प्रसाद...’; आप्तस्वकीयांना पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज

Aug 21, 2024 05:06 AM IST

Good Morning Wishes Marathi:आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे तर,आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

Good Morning Wishes
Good Morning Wishes (shutterstock)

Good Morning Wishes Marathi: दूर राहत असलेल्या आपल्या प्रियजनांना हे छान आणि सुंदर गुड मॉर्निंग संदेश पाठवून आपण आपली काळजी आणि प्रेम व्यक्त करू शकता. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर, आपला संपूर्ण दिवस आनंदी जाऊ शकतो. याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. 

 

जन्माची नाती...

हा ईश्वराचा प्रसाद आहे!

पण स्वतः बनवलेली नाती 

हे आपले पुण्य व सत्कर्म आहे!

शुभ सकाळ

 

-------------------------------

 

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, 

कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,

त्याच प्रमाणे जीवनात अपयश आले, 

तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते!

गुड मॉर्निंग

 

-------------------------------

 

लोक सोन्याला घासून बघतात,

चंदनाला उगाळून लावतात. 

झिज ही खऱ्याचीच होत असते,

खऱ्याला स्वतःचा खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो!

शुभ सकाळ

 

-------------------------------

 

कधीतरी स्वतःलाच कॉल करून पहा, 

तो बिझी लागेल,

कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो, 

पण स्वतःसाठी आपण नेहमीच बिझी असतो!

गुड मॉर्निंग

 

-------------------------------

 

जो दुसऱ्यांना मान देतो,

मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो,

कारण...

माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो,

जे त्याच्या जवळ असते!

शुभ सकाळ

 

-------------------------------

 

पुण्य दिसत नाही,पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं,

कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं,

तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं!

शुभ सकाळ

 

 

मनाला भावनेने जिंकायचे, 

रागाला प्रेमाने जिंकायचे, 

अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे, 

अपयशाला धीराने जिंकायचे, 

संकटांना धैर्याने जिंकायचे आणि, 

माणसाला माणुसकीने जिंकायचे!

गुड मॉर्निंग

 

-------------------------------

 

कोणालाही न दुखवता जगणे, 

याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. 

आणि ज्याला हे कळले, 

त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही!

शुभ सकाळ

 

-------------------------------

 

आयुष्यातल्या असंख्य प्रॉब्लेमची,

फक्त दोनच कारणं असतात..

एकतर आपण विचार न करता 

कृती करतो,

किंवा कृती करण्याऐवजी,

फक्त विचारच करत बसतो!

शुभ सकाळ

 

-------------------------------

 

मन आणि घर वेळोवेळी स्वच्छ ठेवावे, 

कारण घरात निरर्थक गोष्टी व मनात निरर्थक गैरसमज 

अनेकदा भरलेले असतात!

शुभ सकाळ

विभाग