Good Morning Marathi Message: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभूती घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मकता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. सकाळची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय म्हणावे लागेल. तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमच्या मित्रांना हे १० उत्तम विचार शेअर करू शकता.
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची.
शुभ सकाळ!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.
शुभ सकाळ!
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते.
सुप्रभात!
प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
जसे तुम्ही.
शुभ सकाळ!
जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.
शुभ सकाळ!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
सुप्रभात!
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
सुप्रभात!