Good Morning Wishes Marathi: एखाद्या जवळच्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. तसेच तुमच्यामधील नातेही आणखी घट्ट होते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या संदेशांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही आनंद मिळतो. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा खास बनवायचा असेल, तर तुमच्या प्रियजनांना सकाळच्या या सुंदर शुभेच्छा नक्कीच पाठवा...
''वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…''
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे''
''सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…''
गुड मॉर्निंग!
''नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो''
शुभ सकाळ!
''यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात''
शुभ सकाळ!
''धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…''
शुभ सकाळ!
''कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात''
शुभ सकाळ!
''कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी''
सुप्रभात!
''जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.''
सुप्रभात!
''छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही.
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.''
गुड मॉर्निंग!